पान:इतिहास-विहार.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४
केळकरांचे लेख

तर त्याच्या योगानें मुसलमानी बादशाहीचाहि अंत होऊन दिल्ली शहर : इंग्रजांचे स्वाधीन झालें.

दिल्लीची रुधिरप्रिय देवता

 'दिल्ली' हें नांव उच्चारल्याबरोबर जशी अनेक ऐतिहासिक गोष्टींची यठवण होऊन मनांत कालवाकालव होते, तशी दुसऱ्या कोणत्याहि शहराच्या नांवानें होत नाहीं.. कारण या शहरानें जितकें सुख व ऐश्वर्य पाहिलें तितकेंच दुःखहि पाहिलें. पण सुख तेवढे विसरून जाऊन दुःखाची तेवढी आठवण अधिक राहाण्याची मनुष्याच्या मनाची प्रवृत्ति असते. यामुळे दिल्ली हें नांव उच्चारतांच इतिहासज्ञांना दुःखदायक गोष्टींच अधिक आठवतात. दिल्ली अथवा इंद्रप्रस्थ हैं नगर प्रथम बसविण्यांत आलें तें खांडववन जाळून, हें वर सांगण्यांत आलेच आहे. या प्रसंगीं नाग म्हणजे -रूपकदृष्ट्या सर्प, पण वस्तुतः नाग नांवाचे लोक यांची जी कत्तल झाली असें मानितां येईल, त्याच कत्तलीची दिल्लीच्या पुढील इतिहासांत अनेक- वार पुनरुक्ति झाल्याचे आढळते. इंद्रप्रस्थ नगरीच्या वास्तुदेवतेस रक्त- प्राशनाची कांहीं अनिवारच हाव असली पाहिजे; कारण असे एकहि शतक . किंवा अर्धशतक लोटलें नसेल कीं, ज्या अवधीत दिल्लीस एखादी प्रचंड - कत्तल होऊन नगरभूमीवर रक्ताचा सडा शिंपडला गेला नाहीं ! सन - १३३९ सालीं महंमद तघलखानें आपली राजधानी दौलताबादेस नेण्याचा विचार केला, तो दिल्लीच्या नागरिकांस पसंत नव्हता; व तो सक्तीनें अमलांत आणण्याचे काम हजारों लोक मारले गेल्याचे सांगतात.सन १३९८ सालीं तैमूरलंगानें दिल्ली घेतल्यावर त्याचे शिपाई लोक एकसारखी पांच दिवसपर्यंत दिल्लीच्या नागरिकांची कत्तल करीत होते ! रस्त्यांतून · जाण्यास मार्ग नाहीं इतक्या प्रेतांच्या राशी सर्व शहरभर पसरल्या. हिरे, माणकें, सोने, चांदी, वगैरे लूट तर किती जमा झाली त्यांची गणतीच नाहीं ! पकड, लूट व मारहाण यांशिवाय कोणास कांहीं सुचेना. प्रत्येक शिपायानें निदान पंचवीस गुलाम पकडून आणिले व सर्व दिल्ली शहर ओस पडलें." नादीरशहाने १७३९ साली दिल्लीस केलेली कत्तल प्रसिद्धच आहे. पुन्हा एक वेळ इतिहासकाराच्या शब्दांनी