पान:इतिहास-विहार.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दिल्लीचा ऐतिहासिक चित्रपट

६३

प्रवेश केला; व तेव्हांपासून मराठ्यांचें वजन खुद्द दिल्लीच्या दरबारांत जे. पडलें तें पुढें सुमारें वीस पंचवीस वर्षे कायम होतें.

पाटीलबुवांचें यश

 'नारायणराव पेशव्यांच्या मरणोत्तर पेशवाईतील भांडणामुळे शिंद्यास 'दिल्ली सोडून दक्षिणेकडे येऊन राहावे लागले. यामुळे मराठ्यांचा हात.. दिल्ली येथील कारस्थानांतून सुटत चालला होता; पण सन १७८३ साली सालबाई येथें इंग्रज व पेशवे यांचा तह झाल्यानंतर महादजी फिरून द्विगुणित तेजानें दिल्लीस गेला; आणि इंग्रज व मराठे यांचें तूर्त संख्य असल्यामुळे, बादशहानें महादजीस दिल्लीचा सर्व कारभार देण्याच्या काम इंग्रजांनी अडथळा केला नाहीं. महादजीने बादशहाकडून पेशव्यांच्या नांवानें 'वकील - ई - मुतलक्' ही पदवी व बहुमानाची पालखी घेतली; आणि स्वतः गंगा व यमुना यांचे आसपास राहून तो उत्तर हिंदुस्थानच्या सर्व कारभासचीं सूत्रे हालवूं लागला. पुढे गुलाम कादर दिल्लीस जाऊन राहिल्यावर त्याने महादजीचें वर्चस्व कमी करण्याचा कट आरंभिला. या गोष्टीस दुर्दैवी बादशहानेंहि भर दिली. पण तिचा परिणाम अखेर अ झाला की, गुलाम कादरानें बादशहाबरच उठून त्याचे अनन्वित हाल केले; व दिल्ली शहरांत-नादीरशहा, अहमदशहा किंवा तैमूरलंग यांनीहि न केलेला असा- दिल्लीच्या तक्ताचा त्यानें अपमान केला. अखेर महाद्रजीचा सरदार राणाखान यानें दिल्लींत प्रवेश करून बादशहास सोडविले, आणि गुलाम कादर रास महादजीनें भयंकर शासन केलें, गुलाम कादरची व्यवस्था लागल्यावर महादजीने बादशहास सन १७८९ साली नेमणूक बांधून दिली. नंतर रजपुतांचें शासन करून महादजी दक्षिणेत परत आला, व सन १७१३ सार्ली पुण्यास भरण पावला. दिल्लीस मराठ्यांचा अंमल व व्यवस्था पाटीलनुवांनी घालून दिल्याप्रमाणे सन १८० ३ प्रर्यंत चालू होती. पण या सुमारास इंग्रज हे मराठे व मोंगल यांस भारी झाल्यामुळे, नाना फडणविसांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी सुन १८०३ च्या सप्टेंबर ११ तारखेस दिल्ली येथील लढाईत लोई लेक याने शिंधाचे फौजेचा पराभव केला व या एका छावाने मराठ्यांचा दिल्लीचा संबंध तुटला; एवढेच नव्हे,
के... ५