पान:इतिहास-विहार.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
केळकरांचे लेख

घोडेस्वार देऊन पांचरों वोडेस्वारांनिशीं एक मातबर मराठा सरदार खास · हुजरातीच्या नोकरीकरितां व बादशहाच्या रक्षणाकरितां दिल्लीस ठेवून देऊं " असे आश्वासन दिलें होतें. परंतु तें प्रकरण त्या वेळीं तसेंच राहून गेलें. पुढे लवकरच महमदशहा मृत्यु पावला, इकडे नादिरशहाच्या मृत्यूनंतर प्रथम त्याचा बंदिवान असलेला व नंतर त्याचा सरदार झालेला अफगाण योद्धा अहमदशहा अबदाली यानें हिरात जिंकून सन १७४८ साली मुलतान व लाहोर घेतलें, व दिल्लीकडे रोख फिरविला. दिल्लीचा वजीर मीरशहाउद्दीन यानें शिंदे व होळकर यांची मदत मागितली व अहमद- शहास पदच्युत करून दुसरा अलमगीर यास तक्तावर बसविलें. यामुळें अहमदशहा अब्दाली पुढे चाल करून आला; व हेंच प्रकरण जोरानें वाढत जाऊन दिल्लीच्या कारस्थानांचा परिणाम सन १७६१ साली पान- पतच्या लढाईत झाला. ह्या युद्धांत मराठ्यांची जवळजवळ संबंध एक पिढी मारली गेल्यानें मराठ्यांस दिल्लीकडे फिरून पाहण्यास कांहीं वर्षे लागली. दिल्लीच्या बादशहाची स्थितीहि या अवधीत चांगलीशी नव्हती. बादशहा शहाअलम हा सुजाउद्दवला व नजीबखान यांच्या तंत्राने वागूं लागला; त्याची दिल्ली सुटली व बंगालमध्ये इंग्रज उदयास येऊन सन १७६४ साली बादशहानें बंगाल प्रांताची दिवाणी इंग्रजांस दिली. पुढे 'आपणास दिल्लीस नेऊन तक्तावर बसवावें असें सन १७६६ साली बादशहानें अलाहाबादेहून मराठ्यांकडे बोलणें लाविलें, प्रथम तें त्यांस मान्य करितां आलें नाहीं. पण पानिपतानंतर अवघ्या सात वर्षांत थोरल्या माधवराव पेशव्यानें दक्षिणेत मराठ्यांचा फिरून, चांगला जम बसविल्यामुळे 'महादजी शिंदे व तुकोजी होळकर यांना सन १७६८ सालीं उत्तर हिंदु- स्थानांत प्रवेश करिता आला. मराठ्यांचा मुख्य शत्रु व पानिपतच्या अपयशास कारणीभूत झालेला. नजीबखान रोहिला यापूर्वी नुकताच बारला होता. यामुळे महादजीस खुद्दः नजीबखानाचा सूड जरी घेता आला नाही, तरी एकंदरीने पठाणांस जरब बसविण्याचं त्याचें काम सोपे झाले. सन १७७१ साली बादशहानें मराठ्यांकडे फिरून मदत मागितली व स्था सालीं डिसेंबर महिन्यांत—म्हणजे पानिपतच्या लढाईपासून अवघ्या दहा बुनोच्या आंत महादजी शिंद्याने शहाअलम यास बरोबर घेऊन दिल्लीत