पान:इतिहास-विहार.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दिल्लीचा ऐतिहासिक चित्रपट

६१

माळव्याची जहागीर व तेरा लक्ष रुपये बाजीरावास मिळालेच. सन १७३८ साली नादरशहाने दिल्ली घेतली तेव्हां दिल्लीच्या बादशहाच्या कुमकेस जाण्याचा बाजीरावाचा विचार होता. या कामाकरितां वसईची फत्ते झाल्याबरोबर चिमणाजी आप्पा वगैरे सर्व सरदार आणि निमाज नासरजंग यांसहवर्तमान दिल्लीस जाऊन तो नादीरशहाशीं सामना करणार होता. दिल्लीचे मोगल बादशहावर आपली सत्ता आतां बहुतेक स्थापित झाली आहे अशी मनांतून जाणीव असल्यामुळे, इराणच्या शहानें दिल्ली हस्तगत करून तेथे नवीन बादशाही स्थापित करणें, हें अस्तास जाणान्या मोंगलां- प्रमाणेंच उदयास येणाऱ्या मराठ्यांनाहि एक नवीन अरिष्टच उद्भवत आहे असें बाजीरावास वाटले; आणि हिंदु लोकांबरोबर मुसलमान लोकहि या कामी खांद्यास खांदा लावून लढतील अशी त्यास अपेक्षा होती. नादीर-. शहावर स्वारी करण्याकरितां नर्मदा आणि चंबळा यांच्यामधील मुलूख आपण लवकरच 'मराठामय' करून सोडणार असें बाजीरावानें जाहीर केल्याचें ग्रैंडडफहि लिहितो. परंतु इतक्यांत नादीरशहा हा मोगल बादशहा } महंमदशहा यास फिरून तक्तावर बसवून, त्याचा अंमल सर्व हिंदुमुसल- मानांनी पूर्ववत् मानावा अशीं हिंदुस्थानांतील राजेरजवाड्यांस पत्र लिहून इराणकडे निघून गेला, त्यामुळे बाजीरावास दिल्लीस जाण्याचे कारण पाहिले नाही. पुढील साली बाजीराव नर्मदातीरीं मरण पावला. तात्पर्य, शाहूचें तोंड दक्षिणेकडे आणि औरंगजेबाच्या मुलांचें तोंड उत्तरेकडे फिरल्यापासून दिल्लीच्या कारस्थानांत मराठयांचा जो प्रवेश झाला त्यास बाजविानें बरेंचं स्वरूप आणिलें.

शिंद्यांचा दिल्लीत प्रवेश

 बाजीरावाच्या मरणानंतर नानासाहेब पेशव्यांनीं माळव्याच्या जहागिरी- संबंधानें फिरून दिल्लीस कारवाई सुरू केली. चिमणाजीआप्पा ब नानासाहेब पेशवे या दोघांनी मिळून दिल्लीच्या बादशहास १७४१ साली एक अर्ज केला. त्यांत प्रवरा लक्ष रुपये देणगीची मागणी केली असून त्याच्या मोबदला "नर्मदेच्या 'उत्तर मुलखाचा आम्ही बंदोबस्त ठेवू, स्वतः दिल्लीस जाऊन बादशहास भेटू, बादशहाच्या नोकरीस चार हजार मराठे