पान:इतिहास-विहार.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
केळकरांचे लेख

थोडा वेळ होता. औरंगजेबानें दक्षिणेतील मुसलमानी राज्यें बुडविल्यावर महाराष्ट्र हैं. दिल्लीच्या बादशहांच्या ताब्यांत जाण्याचा संभव होता, परंतु खुद्द शहाजहान व औरंगजेब यांच्या कारकीर्दीत ज्याप्रमाणे शिवाजीनें दिल्लीच्या मुसलमानांशी विरोध करून यश मिळविलें, त्याचप्रमाणे औरंग- जेबाच्या कारकीर्दीच्या अखेर राजाराम व त्याचे सराठे सरदार यांनी मोगलांची डाळ महाराष्ट्रांत शिजूं दिली नाही. औरंगजेबाच्या मरणानंतर 'दक्षिणेत त्याच्याबरोबर असलेला त्याचा मुलगा अज्जमशहा यानें दिल्लीचें तं मिळविण्याकरितां उत्तरेकडे तोंड फिरविलें;पण लवकरच त्याचा भाऊ मोयनम यांजकडून तो मारला गेला; व पुढील साली त्याचा माऊ - विजापूरचा सुभेदार- कामबक्ष हाहि मारला जाऊन दक्षिणेत मोंगल निर्मूल झाले. औरंगजेबाचा उरलेला मुलगा मुअज्जम ऊर्फ बहादुरशा याच्या कारकीर्दीत दिल्लीस कैदेत असलेला शिवाजीचा नातू शाहू छा सुटून दक्षिणेत आल्यानें उलट मराठी राज्याच्या सुस्थितीस मदतच झाली. शाहूच्या कारकीर्दीत मराठे व दिल्लीचे बादशहा यांचा संबंध मित्रत्वाचा होता. दिल्लीच्या बादशहाकडून सनदा आणण्याकरितां बाळाजी विश्वनाथ दिल्लीस गेला असतां तेथें मत्सरी मुसलमान सरदारांनी रस्त्यांत त्याच्या- वर हल्ला करून सनदा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, तो प्रसंग प्रसिद्धच आहे.

बाजीरावाची महत्त्वाकांक्षा

 मोगल बादशहाचा परवाना घेऊन उत्तरेस मुलूख काबीज करीत करीत मराठ्यांचे वजन दिल्लीपर्यंत नेऊन बसविण्याची कल्पना बाळानी 'विश्वनाथाचा मुलगा' पहिला बाजीराव यांचे मनांत चांगलीच जागृत होती: चंबळानदीच्या दक्षिण मुलखाची सर्व जहागीर, दक्षिणच्या सहहि सुभ्यांची सरदेशपांडे गिरी, आणि अलाहाबाद, बनारस, गया, मथुरा या हिंदु क्षेत्रांची जहागीर ही मिळण्याविषयी त्याने दिल्लीच्या बादशहाकडे उम्रड मागणीहि केली होती, "वती नाकारण्यात आल्यामुळे सन १७३६ साली बाजीरावानें दिल्लीवर स्वारी करून दिल्लीच्या वेशीबाहेर छावणीचा तळही दिला होता? पण त्याच्याजवळ थोडे लोक असल्यामुळे त्यास परत फिरावे लागलें तरी