पान:इतिहास-विहार.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दिल्लीचा ऐतिहासिक चित्रपट

५९

जुम्मामशीद बांधिली. पुढें औरंगजेबाच्या वेळेपासून मात्र मोंगलवंशाची: समाप्ति होईपर्यंत दिल्ली हीच कायम राजधानी राहिली. औरंगजेबहि मधून मधून आग्र्यास राही. शिवाजीमहाराज संभाजीसह औरंगजेबाकडे दिल्ली येथे गेले, अशी आजपर्यंत समजूत होती. पण या वेळी औरंगजेब आग्र्यास रहात असे; व शिवाजीमहाराज औरंगजेबाच्या कैदेत पडल्यावर पेटाऱ्यांत बसून निसटून आले ते आग्र्याहून दिल्लीहून नव्हे असें आतां निश्चित झाले आहे. औरंगजेबानंतर मोगल वंश खालावला असतां, सन १७.३९ साली इराणचा बादशहा नादीरशहा यानें, सन १७५६ साली दुराणी अहमदशहा अबदाली यानें, सन १७५९ साली मराठ्यांनी, व -१८०३ साली इंग्रजांनी दिल्ली जिंकून हस्तगत केली. परंतु १८५७ सालापर्यंत ती नावानें तरी मोंगलांचीच राजधानी होती. अखेर १८५७ साली बंडाचा मोड झाल्यावर शेवटचा मोंगल बादशहा बहादूरशहा याचे मुलगे दिल्लीस मारले जाऊन बहादूरशहास उचलून ब्रह्मदेशांत नेऊन ठेवण्यांत आले, व तेव्हांपासून राजधानी या नात्यानें मुसलमानांचा व दिल्लीचा कायमचा संबंध तुटला.

दिल्ली व मराठे

 मुसलमान लोक व दिल्ली शहर यांचा संबंध सर्वोत अलीकडचा, यामुळे तो विशेष प्रमुख व ढळढळीत दिसतो.तथापि, हिंदु लोकांचा सदर पौराणिक काळांत दिल्ली ऊर्फ व तेराव्या शतकापर्यंत तें सर्व शहराचा संबंध कांहीं थोडाथोडका नाहीं. इंद्रप्रस्थ नगरची स्थापना हिंदूंनींच केली; वेळ. हिंदुराजांची राजधानी नसली तरी हिंदुराजांच्याच ताब्यांत होतें: आजहि तेथें मुसलमानांपेक्षां हिंदूंचीच वस्ती अधिक आहे. खुद्द मराठ्यांचा मात्र दिल्लीशी संबंध फारसा जुना नाहीं. तेराव्या शतकांत मुसलमानांनी दक्षिण प्रांत जिंकण्यास सुरवात केली व त्यांच्या सुभेदान्या इकडे स्थापन झाल्या. परंतु पुढे लवकरच मुसलमानी सुभेदार स्वतंत्र होऊन त्यांनी स्वतःची राज्ये स्थापिलीं; आणि महाराष्ट्र दोन शतकेंपर्यंत मधूनमधून व जाऊन येऊन या स्वतंत्र झालेल्या मुसलमानी राजांच्या ताब्यांत होते: दिल्लीच्या बादशहांचा प्रत्यक्ष, असा अंमल महाराष्ट्रांत - फारच थोडा व