पान:इतिहास-विहार.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
केळकरांचे लेख

‘इतिहासबाचकांस माहीत आहेच. येथे सांगावयाचा मुद्दा इतकाच कीं, सन १२०६ पासून सन १८०३ पर्यंत दिल्ली शहर मुसलमान राजांच्या तांब्यांत होते, तरी या सर्व सहारों वर्षभर दिल्ली हीच मुसलमानांची राज- धानी होती असे मात्र नाहीं. तघलख व खिलजी यांच्या अमदानीत दिल्ली द्दी मुसलमानांची राजधानी होती. वेढ्या महमद तघलखानें दिल्ली सोडून दक्षिणेत दौलताबादेस राजधानी स्थापण्यांचा दोन वेळां प्रयत्न केला; परंतु तो सिद्धीस गेला नाहीं. तघलखांच्या कारकीर्दीत जुन्या दिल्लीजवळ दुसरीं दोन गांवठाणे आणखी वसविण्यांत आलीं; व त्यांपैकी हल्लींच्या दिल्लीपासून सुमारें चार मैलांवर असलेले तघलखाबाद अद्याप आहे. इब्नबतूता नांवाचा पाश्चात्य प्रवासी चवदाव्या शतकांत उत्तर हिंदुस्थानां- त येऊन राहिला होता. त्यानें चार दिल्ली शहरांचे अर्थात् दिल्ली या नांच्या जुन्या व नव्या चार गांवठाणांचें वर्णन दिले आहे. इ. स. १३९८ सालीं तैमूरलंगानें दिल्ली शहर हस्तगत केलें. परंतु तो नुसती लूट व गुलाम घेऊन लवकरच समरकंद येथें परत गेला. यानंतर झालेल्या लोदी घराण्याच्या वेळीहि दिल्ली हीच मुसलमानांची राजधानी होती. पुढें बाबरानें इब्राहम लोदीचा पानपतं येथें पराभव करून मोंगल राज- वंश स्थापला. पण औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत दिल्ली येथे मोंगल राजांचें कायमचें ठाणें असें नव्हतें. बाबराचे पुष्कळ दिवस लाहोर येथेंच गेले, त्याचा मुलगा हुमायून यानें, हल्लीं पुराणा किल्ला या नांवानें प्रसिद्ध असलेला किल्ला दिल्लीस बांधला. पण हुमायून दिल्लीत असा फार थोडे दिवस राहिला. अकबर जरी दिल्लीचा बादशहा होता तरी त्याचे बहुतेक दिवस आग्रा येथेच गेले. किंबहुना फत्तेपूर शिक्री येथे बांधलेल्या प्रचंड इमारतीमुळे कांहीं काळपर्यंत मोंगल राजधानी दिल्लीहून उठून या नवीन नगरीत जाऊन राहिली होती असेंहि म्हणतां येईल, अबुल फजल यानें 'ऐन- ई-अकबरी' मध्ये दिल्ली शहराचे वर्णन केले आहे. पण त्यावरून त्या . राजधानीच्या ऐश्वर्यापेक्षां तिच्या खालावलेल्या स्थितीचा उदासपणाच अधिक प्रकट होतो. जहांगिराच्या वेळेसहि आमा हीच मोंगलराजधानी होती. त्याचा मुलगा शहाजहान हांहि आभ्यास बरेच दिवस होता. परंतु हुल्लींच्या दिल्ली शहराचें गांवठाण शहाजहानार्नेच प्रथम वसविले. त्यानेश्व