पान:इतिहास-विहार.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दिल्लीचा ऐतिहांसिक चित्रपट

५७

यादव वंशाची एक शाखा दिल्ली येथें राज्य करीत होती. अनिरुद्धाचा मुलगा वज्र याला दिल्ली येथेंच: राज्याभिषेक झाल्याचा उल्लेख आहे. पौरा णिक काल आणि ऐतिहासिक काल यांच्या दरम्यानच्या मंद संधिप्रकाशांत इतर अनेक गोष्टींप्रमाणे दिल्लीचा वृत्तांतहि लोपून गेलेला आहे. ऐतिहासिक कालाच्या प्रारंभी दुसऱ्या शतकांत धाव नामक राजा दिल्लीस राज्य करीत असून हल्ली त्याचा एक जयस्तंभ तेथे आहे. अकराव्या शतकांत दिल्लीस अनंगपाळ नांवाचा क्षत्रियः राजा राज्य करीत होता हेंहि निश्चित आहे; क येथपासून पुढे झालेले निरनिराळे राजवंश व त्यांतील प्रसिद्ध पुरुष यांची सर्व संगत लागते - किंबहुना ही संगति पटविणाऱ्या इमारती अद्यापि दिल्लीस उभ्या असून प्रत्यक्ष पहाण्यास सांपडतात. दहाव्या शतकापूर्वीच हिंदु राज्ये दक्षिणेस मथुरेकडे व पूर्वेस गंगानदीच्या कांठीं पसरली होती. या वेळी दिल्लीच्या पूर्ववैभवाचा कांहीं कालपर्यंत लोप झाला असावा, वं. पुढें दक्षिणच्या राज्यांची अवनतीची पाळी येऊन, दहाव्या शतकाच्या 'सुमारास दिल्लीस फिरून वैभव येत चाललें असावें. इ. स. १०५२ साली अनंगपाळानं, हल्लींच्या कुतुबमिनारच्या जागेवर असलेला किल्ला बांधला, आणि मथुरेस असलेला चंद्रगुप्त विक्रमादित्याचा जयस्तंभ तेथून काढून आणून दिल्लीस या किल्ल्याशेजारीं रोविला तो अजूनहि पहाण्यास मिळतो. अनंगपाळाच्या वंशाने सुमारे १०० वर्षे राज्य केल्यावर विशाल- देव नामक अजमीर येथील चव्हाण राजानें दिल्लीस राज्य स्थापले. याचाच नातू प्रसिद्ध पृथ्वीराज चव्हाण हा होय. कुतुबमिनारच्या लगत आजहि . ज्याचे प्रकार दिसतात, ते हल्लींच्या दिल्लीपासून सात आठ मैलांच्या अंतरायचें जुनें दिल्ली शहर यानेंच बसविलें, याच पृथ्वीराज चव्हाणानें महंमद घोरी याचा प्रथम, सरस्वती नदीच्या तीरीं पराभव केला. परंतु दुसऱ्या खेपेस महंमद घोरीकडून त्याचा पराभव झाला. महंमद घोरीचा तुर्की गुलाम कुतुबुद्दीन यानें दिल्ली हस्तगत केली व मुसलमानी राज्याच्या पायाचा दगड सन १२०६ साली दिल्लीस बसविला गेला.

दिल्ली व मुसलमान पातशहा

 यानंतर एकमान एक झालेल्या मुसलमानी राजवंशांची हकीकत