पान:इतिहास-विहार.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६.
केळकरांचे लेख

बाधून ते आपल्या कुटुंबांतलेच आहेत असें तूं मानतोस ना ? राजा हा आपला मातापिताच आहे, असें प्रजाजनांस वाटत आहेना ?

कचिदायस्यचार्थेन चतुर्भागेन वा पुनः ।
पादभागैस्त्रिभिर्वापि व्ययः संशोध्यते तवः ॥ .

 स्वस्ताईचे वेळीं उत्पन्नाचा रे, मध्यम स्थितींत उत्पन्नाचा व दुर्भिक्षा-: वे वेळीं उत्पन्नाच्या चे आंत तुझ्या राज्याचा खर्च आहेना ? तू सष्ट्रास पीडा देत नसून तुझे शेतकरी संतुष्ट आहेतना ?

कचिद्रा तडागानि पूर्णानि च बृहति च ।
भागशो विनिविष्टानि न कृषिर्देवमातृका ।।

 मोठमोठे व पाण्याने भरलेले तलाव शेतांस पाणी देण्यासाठीं तूं योग्य अंतराने बांधले आहेसना ? आकाशांतून देवं पाऊस पाडतील तेवढ्यावरच तुझ्या राज्यांतील शेती अवलंबून नाहींना ? तुझ्या राज्यांतल्या शेतकऱ्यां- जवळची भरपूर पोटगी व बींबियाणें कमी कमी होत नाहींतना ? कारागिरां - स लागणारे भांडवल व धंद्याची हत्यारें बगैरे साधनें तूं त्यांस चार चार महिन्यांनों पुरवितोसना ? तूं व तुझे अधिकारी, लोभ, मोह किंवा अभिमान यांस वश होऊन रयतेस न्याय देण्याकडे दुर्लक्ष करीत नाहींतना ? तुझ्या. कृत्यामुळें प्रजेत दुःख किंवा क्रोध उत्पन्न होत नाहींना. ? खरोखर निष्पाप, कुलीन व सदाचरणी अशा पुरुषांवर खोटे आरोप येऊन त्यांस तुझे: राज्या- ते विनाकारण शासन झालेले नाहींना ? ”

 नारद - नीतीनें विचारलेल्या या व इतर प्रश्नांस आत्मविश्वासपूर्वक प्रामाणिकपणें जो राजा 'होय' असे उत्तर देऊ शकेल किंवा 'एवं करि- व्यामि यथा त्वयोक्तम्' असें बचन देऊन नंतर 'उक्त्वा तथाचैव चकार राजा' असे वागणाऱ्या युधिष्ठिराचे अनुकरण करील त्याचे राज्यास काळा; चीहि भीति बाळगावयास नको.

दिल्लीचे जुने हिंदु राज़े

 पांडवांच्या अमदानीत दिल्ली शहर अर्थातच विशेष भरभराटीस चढले व पूढेहि पांडवांनंतर 'पुरोत्तम' म्हणजे सर्व नगरांमध्ये श्रेष्ठ अशी त्यक आरती ख्याती इतिहास-पुराणांतरीं चालत आलेली होती. पांडवांनंतर