पान:इतिहास-विहार.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दिल्लीचा ऐतिहासिक चित्रपट

५५

धर्मराजास प्रश्नरूपानें जी उत्तम राजनीति उपदेशिली आहे, ती कोणच्याहि ' प्रसंगीं पाहण्यासारखी आहे. किंबहुना, नारदांच्या ह्या 'कञ्चित्प्रश्ननीति' रूपानें हिंदुस्थानांतील उत्तम राजनीति व राजनिष्ठा जगांतल्या सर्वच राजांस पुन्हा प्रश्न विचारीत आहे असा, ही नीति वाचणारांस भास झाल्यावांचून रहात नाहीं. नारदांची ही 'कञ्चित्प्रभनीति' सर्व देशच्या व सर्व कालच्या राजांस व राज्यकर्त्यांस पुढील आशयाचे प्रश्न करीत आहे:-

 'राजाचें राज्य टिकण्यास धर्म व अर्थ या दोहोंचेहि बळ पाहिजे असतें. राजानें अर्थाविषय लोभ धरून धर्म बुडवूं नये; धर्माकडे लक्ष देऊन अर्थाकडे दुर्लक्ष करूं नये किंवा तात्कालिक सुखावर लुब्ध होऊन धर्म व अर्थं ह्या दोन्हींविषयीं उदासीन बनूं नये. राजा, तूं असाच वागत आहेसना ? तुझे राज्याधिकारी पुरुष ऐश्वर्यमदाने धुंद व कर्तव्यपराङ्मुखं होऊन स्वतःच्या व तुझ्या भावी नाशास कारणीभूत होत नाहीत ना?

विजयो मंत्रमूलो हि राज्ञां भवति भारत !

राजाचा विजय त्यास जो सल्ला मिळेल त्यावरच अवलंबून असतो; तर तुझे सल्लागार मंत्री वृद्ध, कुलीन, सदाचरणी, स्वामिनिष्ठ असेच आहेत ना १ कृषिकर्म, व्यापार वगैरे थोड्या भांडवलावरे होणाऱ्या व पुढें जास्त नफा मिळवून देणाऱ्या धंद्यांस तूं उतेजन देतोसना ? निदान हे व्यवसाय . करणारांस तू अडथळे तरी करीत नाहींस ना ? तुझ्या राज्यांतील आचार्य म्हणजे गुरु सर्व कुमारांना तरुण पिढीला - सर्व विद्या - विशेषतः धनुर्विद्या शिकवून वीर बनवीत आहेत ना ! शत्रूच्या गुप्त बातम्या काढण्यास गुप्त हर अवश्य ठेवलेच पाहिजेत; पण आपले अधिकारी प्रेजेस पाळतात की गांजतात, हे पहाण्यासाठीं आपल्या प्रत्येक अधिकाऱ्याचे मागें तूं तीन तीन गुप्त हेर ठेवले आहेस ना !

कचिन्नोग्रेण दंडेन भृशमुद्विजसे प्रजाः ।

 वरचेवर कडक शासन करून तूं प्रजेला उद्विग्न व असंतुष्ट करीत नाहीस ना? 'उग्रप्रतिग्रहीता' - 'जबर कर कंडकपणे वसूल करणारा' अशी ना तुला लोक ठेवीत नाहींतना १ युद्धांत पराभूत करून एकदां जिंकल्या-वर मग जिंकलेल्यांना तूं पुत्रवत् मानीत आहेसना ? सर्व प्रजाजनांशी सारखा