पान:इतिहास-विहार.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केळकरांचे लेख

हस्तलिखितें, सनदा, शिक्के वगैरे पाहिले म्हणजे मनुष्य थक्क होऊन जातो. नेल्लूर रोमन इतिहासाचें संशोधन व मॅक्समुल्लर प्रभृतींनीं वैदिक इति- हासाचें संशोधन केलें त्याला स्वदेशाचा अभिमान हेंहि कारण नव्हतें, आणि खरोखरच हा निःस्वार्थी आनंद आहे. संशोधकाला हर्ष, अमर्ष, -खेद हे मुळींच नसतात, त्याला मानपतच्या पराभवाची पत्रे सांपडीत, - नारायणरावाच्या वधाचीं सांपडोत किंवा सवाई माधवरावाच्या रंगपंचमीच्या विलासाचीं सांपडोत त्याला ती सर्वच सारखीच प्रिय असतात. मनुष्य निःस्वार्थी असून उत्साही असला म्हणजेच त्याला विक्षिप्त म्हणूं लागतात. संशोधक हा मोठा 'रोमँटिक' प्राणी आहे. कित्येक इतिहास संशोधक स्वतःस या उत्साह भरांत हास्यास्पदहि करून घेतात, नाहीं असें नाहीं. याचें उत्कृष्ट वर्णन 'पिचिक पेपर्स' नामक इंग्रजी कादंबरीत आहे. एका खुळ्यानें एक शिलालेख आणला त्याची सतरा संशोधकांनी सतरा पाठांतरे बनविलीं तरी त्यांतून कांहींच अर्थ निघेना तेव्हां पन्नास विद्वान् सभासदांकडून त्यावर पन्नास निबंध लिहिले जाऊन तुंबळ रणें माजली, व शेवटीं अकल्पित रीतीने असे उघडकीस आलें कीं यांतील दगड तेवढा फार प्राचीन - सर्वच दगड प्राचीन असतात पण त्यावरील लेख मात्र अगदीं ताजा, मला वाटतें विश्वगुणादर्शकाराच्या हाती 'संशोधक' सांपडला तर त्यानें खालच्या दोन श्लोकांतल्याप्रमाणे त्यांची खुतिगर्भनिंदा केली असती.

'उद्ध्वस्तवर्णरुचिचित्रकलापहर्म्यः

विच्छिन्नलेखन पुराणशिलासनस्थः ।
दुष्कीट भुक्तशतपत्रपटोत्तरीयः
निर्मूल्यनाणकगणैः परिपूर्णकोशः ।
नष्टाधिकारपरिहासित गर्व मुद्रः
संदेहवृत्तिवशन्रहणयंत्रदृष्टिः
श्रद्धा वितर्कपरिचारक वेष्टितांगः संशोधकः

खलु प्रशास्ति विशून्य राज्यम् ॥ "

 'यांत वर्णन केल्याप्रमाणे या संशोधक महाराजांचा वाडा रंग उडून- गेलेल्या चित्रांनी भूषित असतो, त्यांचे सिंहासन म्हणजे पुसट लेख असलेला
...