पान:इतिहास-विहार.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
केळकरांचे लेख

पाण्याने भरलेले नवें असे मंगलसूचक - कुंभ ठेवले होते; व पांडवांचे स्वागतार्थ ठिकठिकाण सुंदर व कुलीन कुमारिका उभ्या होत्या. धर्माचें स्वागतार्थ नागरिकांनी नगर व राजरस्ते पांढऱ्या फुलांच्या माळा व पताका यांनी शृंगारले असून मधून मधून सुगंधित धूपहि जळत होते. पांडवांचा रथ नगरांत येतांच चंद्रोदयाच्या वेळीं समुद्राच्या लाटा उसळतात त्या- प्रमार्गे राजरस्त्यांत जनसमुदाय उसळत होता; व भोवतालची घरें खी- पुरुषांचे भारानें कांपत होती ! स्त्रियांचें लक्ष अर्थात् वैभवशाली द्रौपदी- कडेच विशेष ओढले होते. मिरवणूक आटोपल्यानंतर युधिष्ठिराचा राज्या- भिषेक समारंभ झाला. त्या वेळी धर्मराजा पूर्वाभिमुख असलेल्या सुवर्ण- सिंहासनावर बसला; त्याचे दोहों बाजूस भीमार्जुन बसले असून समोर श्रीकृष्णादि यादव वीर होते; कुंती व नकुलसहदेव एकीकडे होते. ब दुसरीकडे धृतराष्ट्र विदुरादि अवशिष्ट कौरवपक्षीय मंडळी बसली होती. ' प्रथमतः धर्मानें पांढरी फुलें, अक्षता, भूमि, सोनें, रुपें व माणकें यांस हस्तस्पर्श केला. नंतर प्रधान व मंत्री यांनी राजाजवळ जाऊन त्यास नम- स्कार केल्यावर व्याघ्रचर्माने मढविलेल्या व मजबूत अशा अष्टकोनी सर्वतो- भद्र आसनावर युधिष्ठिर व द्रौपदी ह्रीं येऊन बसली. त्यांनी राज्याभिषेक- विधीप्रमाणें होम केल्यानंतर श्रीकृष्णांनी स्वतः उठून कुरुक्षेत्र दणदण- विलेल्या आपल्या पांचजन्य शंखांतील उदकानें त्यांस राज्याभिषेक केला. शंखांतून अभिषेकाच्या धारा पडूं लागतांच दुंदुभी वगैरे वाद्यांचा एकच गजर होऊन त्या योगानें धर्मास राज्याभिषेक झाल्याचे वृत्त राजवाड्या- चारच्या सर्व लोकांस विदित झाले.

आर्य राजनीतीचा मासला

 महाभारतांतील वर्णनावरून त्या काळचं दिल्ली शहर, तेथील राजांचें वैभव, नगरप्रवेश व राज्याभिषेकसमारंभ आणि राजसूय- अश्वमेधादि मोठे प्रसंग यांची जशी ओळख होते, तशीच त्या काळच्या राजनीतीची व राजांच्या कर्तव्याचीहि माहिती देणारे अनेक भाग महाभारतांत वर्णिले आहेत, त्या सर्वांचा परामर्ष घेणें या लेखांत शक्य नाहीं व जरूरहि नाहीं. परंतु मयसभा निर्माण झाल्यानंतर लवकरच तेथें नारद आले; त्यांनी