पान:इतिहास-विहार.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दिल्लीचा ऐतिहासिक चित्रपट

५३

अत्यंत थाटाचा. झाला. त्या समारंभास तपोनिष्ठ ऋषी व विद्वान् ब्राह्मण. गांजबरोबरच आतांप्रमाणे क्षत्रिय राजे, आणि नामांकित मल्ल, नट, गवई वगैरे तमासगीर मंडळीहि जमली होती.

दिल्लींतला पहिला राज्याभिषेक

 पांडवांच्या ह्या अफाट इंद्रप्रस्थ नगरांत व मयनिर्मित राजवाड्यांत लवकरच राजसूय व अश्वमेध हे यज्ञ झाले. त्यांचें विस्तृत व आश्चर्यकारक वर्णन महाभारतांत असून तत्कालीन भरतखंडाच्या वैभवाचा व संपत्तीचा त्यावरून सहज अंदाज बांधतां येतो. भरतखंड व नजीकचे देश: यांतील राजांवर दिग्विजय करून पांडवांनी आपले वर्चस्व स्थापन केल्यावर सर्व राजे अमूल्य करभारासह या यज्ञसमारंभास आले, तेव्हां हस्तिनापूर किंवा इंद्रप्रस्थ नगरांत सबंध जंबुद्वीपांतीलच संपत्ति व वैभव एकवटलेले आहे, असा भास होत असे! राजांनी आणलेल्या नजराण्यांत व त्यांचे- बरोबरहि अनेकं बहुमूल्य रत्ने, सोन्याची नाणी, भांडी व अलंकार, रत्न, स्वचित व हस्तिदंती मुठीच्या आणि आकाशाप्रमाणें नीलवर्ण तलवारी, जडावाची चिलखतें, उत्तम शृंगारलेले रथ, बारीक व तलम अशी रेशमार्थी व लोकरीचीं वस्त्रे, भरजरी झुली घातलेले हत्ती व हत्तिणी, बाल्हीक (बल्कः); आन (काठेवाड ) व वनायु (इराण) या देशचे जगप्रसिद्ध घोडे वगैरेंवी केवळ वर्णने वाचणाराहि त्या काळच्या वैभवानें दिपून जातो. भारतीय युद्ध संमून सर्व भरतखंड निष्कंटक झाल्यावर धर्मराजान हस्तिनापुरांत केलेला नगरप्रवेश व त्यानंतर त्यास झालेला राज्याभिषेक यांचेहि सुंदर वर्णन महाभारतांत आढळते. या नगरप्रवेशाचे वेळीं युधिष्ठिरासाठी नवीन रथ तयार केला असून तो तलम लोकरीचीं वखें व मृगाजिने यांनी मढविला होता, व त्यास सोळा पांढरे बैल जुंपले होते. मिरवणुकींतून जाणाऱ्या या रथाचे सारथ्य भीम करीत होता; अर्जुनाने धर्माचे मस्तकावर तारां क्रित शुभ्र सजछत्र धरले होते.. आणि नकुलसहदेव चामरें उडवीत होते या रथाचे मानून युयुत्सु व श्रीकृष्ण जात असून त्यांचे मागें पालखीतून. धृतराष्ट्र, व गांधारी वगैरे राजखिया चालल्या होत्या. त्यांचेमागून क्रमानें अनेक रथ, हत्ती, पायदळ व स्वार असे चालले होते,नगराचे, बेशीत