पान:इतिहास-विहार.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
केळकरांचे लेख

कामगिरी मुख्यतः श्रीकृष्णार्जुनांकडे देण्यांत आली. त्यांनीं पंधरा दिवसांत सर्व खांडववन जाळून टाकून मोकळे केलें. अर्थात् त्या वनांतील तक्षकांची व असुरांची बहुतेक वस्ती या अभिप्रळयांत सांपडून नाहींशी झाली; उरलीसुरली कृष्णार्जुनांच्या बाणांस बळी पडली. तक्षक राजा व त्यांचा पुत्र अश्वसेन आणि असुरांचा कुशल शिल्प, 'मयासुर यांचे मात्र प्राण या अशिप्रळयांतून वाचले. यांपैकी पहिले दोघे कुरुक्षेत्रांत जाऊन राहिले मयासुर आपल्या या नव्या प्राणदात्या यजमानांचे नोकरीस राहिला.

दिल्लीतील पहिला राजवाडा

 जाळून टाकल्यामुळे मोकळ्या झालेल्या ह्या खांडववनांत आपणासाठी एक उत्कृष्ट व प्रचंड सभा - म्हणजे राजवाडा - प्रथमतः बांधवावा, असें पांडवांनी ठरविलें तें काम करण्यास अर्थातच मयासुर एका पायावर तयार झाला; व त्यानें या कामी आपल्या आसुरी शिल्प्रविद्येचा व असुरांच्या संपत्तीचा पांडवांसाठी पूर्ण उपयोग केला. हिमालय पर्वताचे पलीकडे कैलासाचे उत्तरेस मैनाक पर्वतानजीकच्या बिंदुसरोवराजवळ वृषपर्वा नामक असुरराजानें मोठा यज्ञ करून राजवाडे बांधले होते; तेथे पांडवांच्या राजवाड्यास उपयोगी पडतील अशा अनेक उत्कृष्ट शिला, रंग, चूर्णे बगैरे सामुग्री व सानें वगैरे खनिज संपत्ति होती. ती सर्व तेथे जाऊन मयासुरानें इंद्रप्रस्थास आणली; आणि नुकत्याच जाळलेल्या खांडववना- मध्ये त्याने या असुरांच्या सामुग्रीचा उपयोग करून चवदा महिन्यांत दहादा हज़ार हात लांबीरुंदीचा अत्युत्कृष्ट राजवाडा पांडवांसाठी बांधला ? या राजवाड्याच्या भिंती, खांब, तट, कमानी वगैरे सर्व रत्नांनी मढविलेली होतीं. राजवाड्यांत ठिकठिकाणी अनेक चित्रे, व केवळ प्राण मात्र नाहीं इतके हुबेहुब केलेले पुतळेहि ठेवले होते. राजवाड्याच्या आवारांत भया- सुखनें अनेक रत्नांनी बनविलेले कृत्रिम सरोवर तर अत्यंत आश्चर्यकारक होर्ते. हा राजवाडा बांधण्यासाठी 'बिंदुसरोवराजवळून आणलेले आठ हजार 'राक्षस मयासुराने या राजवाड्याचे संरक्षणासाठीच ठेवून घेतले, मयासुराच्या श्री द्वितीय कौशल्याचे चीज करण्याचे हेतूने पांडवांनी उदारपणे या राम- 'वाड्यास 'मयसभा' असेंच नांव दिले. या मयसभेचा प्रथम प्रवेशसमारंभ