पान:इतिहास-विहार.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दिल्लीचा ऐतिहासिक चित्रपट
इद्रप्रस्थाची स्थापना

पांडवांच्या या इंद्रप्रस्थं नगराच्या संबंधाचें जें वर्णन महाभारतांत दिले आहे त्याकडे ऐतिहासिक दृष्टीने पाहतां त्यांतून पुढील हकीकत निष्पन्न वेळी असुर नांवाच्या राक्षसजातीची व होते.ह्या खोड तक्षक नांवाच्या नागजातीची बरीच वस्ती होती. या बनाचा एका बाजूचा भाग रान तोडून मोकळा केल्यावर तेथें पांडवांनीं आपलें नगर श्वसविलें व त्यास प्रारंभी खांडवप्रस्थ असें नांव दिले. या नगराचे भोंवती . त्यांनी समुद्रप्राय खंदक खणले च गमनचुंबित तट उभारले ! पंख पसरलेल्या गरुडाकार वेशी, बुरूज व गोपुरे यांजवर नगरसंरक्षणार्थ अनेक शक्ति, शतघ्नी वगैरे शस्त्रास्त्रे चढवून ठेविलीं. नगराबाहेर अनेक बागबगीचे, राया, लताकुंज, कृत्रिम पर्वत वगैरे विहारस्थळे व पुष्करिणीहि त्यांनी तयार केल्या. अशा प्रकारचें उत्कृष्ट नगर व तेथील युधिष्ठिराची न्यायी राजसत्ता पाहून देशोदेशींचे व्यापारी, कारागीर व विद्वान् ब्राह्मण तेथेंच येऊन राहूं लागले. या नगराचे वैभव आणि विस्तार इतका वाढला की, तेथील रहिवाशांस ती दुसरी इंद्राची अमरावतीच वाटे; आणि म्हणून त्यांनी आपल्या नगरास अभिमानपूर्वक इंद्रप्रस्थ (हल्लींचे इंद्रपत ऊर्फ पुराणाकिल्ला- हा सांप्रतच्या दिल्लीचे दक्षिणेस दोन मैलांवर आहे ) हैं नांव दिलें. पणं इंद्रप्रस्थ नगराच्या वाढत्या वैभवास व विस्तारास नगराची संकुचित मर्यादा पुरेनाशी झाली. सांप्रतकाळी देशाची संपत्ति व लोक- संख्या वाढू लागलो म्हणजे त्याची गर्दी मोडण्यासाठी जशी परदेश जिंकून वसाहती, निर्माण करण्याची आवश्यकता उत्पन्न होते, तसाच प्रकार इंद्र- प्रस्थासंबंधानें झाला, नगरानजीकचे सबंध खांडवबनच मोकळे करून तेथे वसति करण्याची जरूर पांडवांस भासूं लागली. ह्या वनांत वरचेवर मोठमोठे बणवे पेटून त्याचा बराच भाग पूर्वी मोकळा होत असे; पण पुन्हा पाऊस पडून तेथें दाट जंगल बादे, इंद्रप्रस्थनगर स्थापन झाल्यानंतरं सात वेळां याप्रमाणे खांडववनांत मोठमोठे वणवे पेटले, पण सातहि वेळां पुन्हा तेथें अरण्य वाढले. अखेर पांडवांनी सर्वच बन, वणवे पेटले असतां,, जास्त पेटवून देऊन तेथे पुन्हा जंगल वाहू द्यावयाचे नाहीं असा बेत केला. ही