पान:इतिहास-विहार.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
केळकरांचे लेख

संग्राम याच पुरातन रणभूमीवर झालेले आहेत. भरतभूमीचे रक्षण करण्या- ऐवजी स्वतःच्या दुष्कृत्यांनीं भूभार झालेल्या उन्मत्त व मदांधू क्षत्रियांस आणि राजांस मारून परशुरामानें त्यांच्या रक्ताचे पांच मोठे डोह ह्या स्यमंतपंचकां' तच निर्माण केले होते: व. पुढे ह्याच डोहांचीं तेथें ऋषींच्या आशीर्वादाने पवित्र तीर्थं झालीं ! कुरुराजानें या स्थली केलेल्या महान् तपश्चर्येच्या पुण्यानें या स्थलास कुरुक्षेत्र हें पावित्र्यदर्शक नांव मिळालें. याच कुरुक्षेत्रांत पुढें चंद्रवंशीय व पुरूकुलोत्पन्न हस्तिराजानें जगप्रसिद्ध 'इस्तिनापूर नगर वसविलें. या नगराच्या स्थापनेसंबंधानें व नांबाच्या उत्पत्तीसंबंधानें एक निराळीच गोष्ट पुराणांतरीं आढळते. ससा शिकारी कुत्र्यांचा पाठलाग करतांना ज्या जागेवर दिसला ती यशस्वी समजून जसा पुण्यांतील शनवारचा वाडा तेथें बांधण्यांत आला, तसाच एक चमत्कार पुरातनकाळी दृष्टोत्पत्तीस आल्यानंतर हस्तिनापूर नगर वसविण्यांत आलें. अत्रिपुत्र सोमऋषि वनांत हिंडत असतां एके स्थळीं, एका पक्ष्याने झपाट्या- नै: येऊन एका प्रचंड हत्तीस उचलून भरारीसरशी आकाशांत नेल्याचें न्यास दिसले. अर्थात् ही भूमि यशस्वी मानून तेथे त्यानें नगर बसविले व त्यास 'हस्तिनापूर' हें नांव ठेवलें. ह्याच हंस्तिनापुरांत पुरुवंशीय राजे अखेरपर्यंत राज्य करीत असून कौरव पांडवांच्या भाऊबंदकीचे तंटे व अखेरचें संहारक भारतीय युद्ध याच नगरांत व नजीकच्या कुरुक्षेत्रांत झाले. धृतराष्ट्र- पंडुराजापर्यंत कुरुदशाची व पुरुवंशाची राजधानी येथेच होती.. परंतु कौरव व पांडव यांच्या भाऊबंदकीचें, लहानपणच्या खोड्या व कुचेष्टा हैं स्वरूप जाऊन त्यास द्वेषाचें व हाडवैराचे स्वरूप येऊ लागलें. तेव्हां हस्तिनापूरचे जोडीस इंद्रप्रस्थ नांवाचें नवें नगर वसलें, पांडव सर्वं संकटांतून निभावून आणि द्रुपदराजाशी शरीरसंबंध करून हस्तिनापुरास् भरत आल्यावर उभयतांची भाऊबंदकी सान्निध्याने विकोपास जाऊं नये, म्हणून धृतराष्ट्रानें पांडवांस अर्षे राज्य तोडून दिलें; व हस्तिनापुराच्या नैर्ऋत्येस ५० मैल दूर असलेल्या खांडववनांत नवें नगर बसविण्याची त्यांस परवानगी दिली. इंद्रप्रस्थ ऊर्फ अर्वाचीन दिल्ली या शहराचा पाया याप्रमाण माऊबंदकीवर उमारल्यामुळेच की काय, आजपर्यंतच्या इतिहासांत बहुतेक प्रसंगी तिजवर असल्याच भाऊबंदकीमुळे अनेक विपत्ति आल्या आहेत.