पान:इतिहास-विहार.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दिल्लीचा ऐतिहांसिक चित्रपट

४९

राहणे कोणाहि देशाभिमानी मनुष्यास शक्य नाहीं, म्हणून त्याला त्या भावी गोष्टीची मनानें नुसती कल्पना करून समाधान मानणे प्राप्त आहे पण मागील पिढीच्या वैभवाच्या आठवणीइतकीच भावी पिढीच्या वैभवाची आकांक्षा मनुष्यमात्रास प्रिय असते. जॉर्ज बादशहांची हिंदुस्थानच्या भावी वैभवाची कल्पना कदाचित् आमच्या कल्पनेसारखीच तंतोतंत नसेल; परंतु ज्या सहानुभूती मर्यादाक्षेत्र अधिकाधिक वाढत जावें असें राजपुत्र या नात्याने त्यांनी १९०६ सालीं बोलून दाखविलें व ज्या वाढत्या अंगाच्या सहानुभूतीचा उल्लेख त्यांनीं राजा व बादशहा या नात्यानें परवां मुंबईस फिरून एकवार केला, त्या सहानुभूतीची अंतिम परिणति आम्ही प्रजाजनः म्हणतो त्या प्रकारच्या राष्ट्रीय स्वातंत्र्यांत झालीच पाहिजे, हे थोड्याशा विचाराअंती राजेसाहेबांसहि कळून येण्यासारखे आहे. आणि हें राष्ट्रीय स्वातंत्र्य हिंदुस्थानास मिळालेले त्यांना स्वतःला दिसणें शक्य नसले तरी, राजांच्या पिढीचा सांधा खासगी व्यक्तीपेक्षांहि अधिक बेमालूम जडत असल्यामुळे आज ज्या सहानुभूतीने त्यांचे अंतःकरण इतकें व्यापले आहे तिचें अंतिम कार्य त्यांना, त्या वेळी इंग्लंडच्या गादीवर असलेल्या वंशजा च्या द्वारे, अनुभवावयास सांपडेल यांत संशय नाहीं... येवढी प्रस्तावना करून बादशाही दिल्ली शहरांच्या ऐतिहासिक चित्रपटाकडे आपण क्षणभर नजर टाकू.

कुरुक्षेत्राचें महत्त्व

 भरतखंडाचा अतिप्राचीन काळापासून आजपर्यंतचा इतिहास व्यापक स्थूल दृष्टीने पाहणारांच्या डोळ्यांपुढून या देशातील काही स्थळे न हात सदैव कायमचीच नजरेत भरलेली असतात. भरतखंडाच्या उत्पत्ती पासून पश्चिमेस सिंधुसरस्वती नद्यांचा व पूर्वेस गंगायमुना नद्यांचा प्रवाह जसा अखंड चालूच राहिला आहे, त्याप्रमाणं स्वमतपत्रक ऊ कुरुक्षेत्र, पानपत, इस्तिनापूर, दिल्ली ह्या टापूच्या ऐतिहासिक महत्त्वाचा औघहि आजतागायत अखंड वाहत आला आहे. भरतखंडातील बहुतेक सर्व स्वकीय-परकीय सार्वमीमांचे वसतिस्थान नजीकच असन या का देशाची ऐतिहासिक भवितव्यतामिति करणारे आमचे सर्वे युद्ध