पान:इतिहास-विहार.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दिल्लीचा ऐतिहासिक चित्रपट'

ता १२ डिसेंबर १९११ हा दिवस हिंदुस्थानच्या इतिहासांतील अत्यंत महत्वाच्या दिवसापैकी एक मानिला जाईल. कारण या देशात गेली तीन शतकें उदयास येत असलेल्या एकछत्री राजसत्तेच्या प्रति- निधींचा सिंहासनाधिष्ठानसमारंभ आजच्या दिल्लीदरबाराने होणार आहे. इतिहास आणि काळ यांची समव्याप्ति असल्यामुळे इतिहास प्रतिक्षण एक एक पाऊल पुढे टाकीतच असतो. पण रस्त्यानें होणारा प्रवास मौजायला जसे मैलांचे दगड, जप मोजायला जसे माळेचे मणी, किंवा काळ मोजायला जसे घड्याळाच्या तबकडीवरील अंक, तसे इतिहासगणने- ला लोकोत्तर राष्ट्रीय प्रसंग उपयोगी असतात. या दृष्टीने पहातां सन .१८५८ साली हिंदुस्थानचा राज्यकारभार इंग्रजी पार्लमेंटाने आपणाकडे घेतल्यांचा कायदा आणि राणीचा जाहीरनामा हा या शतकांतील असला पहिला, आणि आजचा दरबार हा दुसरा लोकोत्तर प्रसंग होय. १७५७ fवी प्लासीची लढाई ही जशी लष्करी दृष्टीने, १८५८ चा कायदा ही जैसी राज्यघटनेच्या दृष्टीने, तसाच १९११ चा दिल्ली दरवार हा राजा आणि प्रजा यांच्या दरम्यानच्या खास नात्याच्या दृष्टीने इतिहासकारांच्या ताम्रपटावर खोदून ठेवण्यासारखा प्रसंग होय. प्लासीस जे बीज १७५७ खाली पेरलें गेलें, त्याला १८५८ साली अंकुर फुटले; आणि आजच्या दरबारानें त्या अंकुरापासून झालेल्या वृक्षाला फुलें आलीं. यापुढची पायरी म्हणजे ब्रिटिश साम्राज्यांतील इतर भागांप्रमाणें हिंदुस्थानला स्वराज्य मिळून त्याच वृक्षाला फळ येणें ही होय. हें फळ हिंदुस्थानने चाखण्याच्या वेळेपर्यंत जगण्याइतका दीर्घ आयुर्दाय आज जिवंत असलेल्या कोणाह मनुष्यास मिळणें है ईश्वरी नियमाप्रमाणें बहुधा अशक्यच आहे. भीष्म - जसे उत्तरायणाची वाट पहात शरपंजरीं पडले होते, त्याप्रमाणे स्वदेशाच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचा उदय पाहण्याकरितां घोटाळणारा जीव तो भीष्मा चार्याप्रमाणें इच्छामरणी नसल्यानें ती प्रिय गोष्ट घडून येईपर्यंत धरून


  • तारीख १२ डिसेंबर १९११.