पान:इतिहास-विहार.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
केळकरांचे लेख

ब्राह्मण मिळतील आणि श्रीमंतास विनंतिपत्र पाठवितील ऐसा विचार झाला.. आहे." पुढील वर्षी ही गोष्ट प्रत्यक्ष घडूनच आली. जानेवारी १७४३ तः नानासाहेब पेशवे प्रयागास यात्रेकरितां गेले, फेब्रुआरीत काशीजवळ पोंचले काशी हस्तगत करावी अशा विचारानें ढाला काशीकडे फिरविल्याहि. तेव्हां - काशीचा मुसलमान अधिकारी सफदरजंग यानें घाबरून जाऊन सर्व शिष्ट ब्राह्मणांना बोलावून आणून तंबी दिली की, तुमच्या ब्राह्मण राजांनी काशी घेण्याचा बेत केला आहे, त्यांना परत फिरवा. नाहीं तर तुम्हां सर्वोना: मुसलमान करीन. तेव्हां त्याच दिवशीं चारों ब्राह्मण उघडे बोडके काशीबाहेर पेशव्यांच्या छावणीत गेले, व तुम्हीं काशी घेतली तरः इतके ब्राह्मण आज जुलमानें बाटविले जातात असें सांगितलें, तेव्हां पेशव्यांनी विचार केला की, इतक्या ब्राह्मणांना दुःख होते तर काशीक्षेत्र हस्तगत करण्याचे भरीस आम्ही पडत नाहीं. शेवटी काशी जिंकावयाची तर राहिलीच, पण खुद्द नानासाहेबांना गंगास्नान कसें घडतें हीच पंचाईत पंडली ! शेवटी या उघड्याबोडक्या ब्राह्मणांच्या मेळ्यांतून ते काशीस जाऊन गंगास्नान करून आले: पेशव्यांनी इतका विचारीपणा दाखविल्यावर सफदरजंगाला निदान अशा थोर मनुष्याचा सन्मान आपल्याहातून झाला नाही याबद्दल वाईट वाटलें !

 ही वेळ अशी टळली, पण काशी आपल्या स्वाधीन करून घेण्याची मराठ्यांची इच्छा शिल्लकच होती. १७५१ साली पठाणांनी प्रयाग व काशी दोनहि लुटून आपला अंमल बसविला. या गोष्टीमुळे वरील कल्पनेस अधिकच जोर आला. १७५४ सालीं. सफदरजंगानें काशींत मराठ्यांचा अमल बसवून देतो म्हणून कबूल केलें होते; पण पेशव्यांनी बाबूराव महादेव हिंगणे. यांना काशींस अंमल बसविण्याकरितां प्रत्यक्ष पाठविलें तेव्हां सफदर स्वंग टाळाटाळ करूं लागला. पुढे पानिपतचा पराभव झाल्यामुळे ही कल्पना मार्गे पडली. परंतु थोरल्या. धवराव पेशव्यांच्या कारकीर्दीच्या अखेर महाद्र्जी शिंदे न विसपुँजी बिनीवाले यांचा जम उत्तरहिंदुस्थानांत बराच बसला. शहाअलम बादशहास फिरूने दिल्लीस गादीवर बस विण्यासारखें मातब्बर राजकारण मराठ्यांच्या हातीं आलें, तेव्हां बादशहाकडून काशी व प्रयाग बक्षिसादाखल मिळविण्याची कल्पना सहजच सुचली. पण ते