पान:इतिहास-विहार.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साऱ्या धर्मक्षेत्रांचे एकचं नशीब

४५

गेली व अठराव्या शतकांत वजिराकडून ती इंग्रजांनी घेतली. बनारसच्या हल्लीच्या महाराजांचे पूर्वज या वजिरांचेच आश्रित होते, पण पुढे लवकरच चजिराचा अंमल झुगारून देऊन ते स्वतंत्र बनले. येथपासून बनारसेस फिरून हिंदु राजाची वस्ती सुरू झाली, तरी खरा अंमल किंवा अधिराज्य मुसलमानांचेच होतें. . इंग्रजांच्या राज्यांत काशीस दोन बंडे झाली. एक चेतासंगाचें व दुसरें १८५७ सालचे. पण या दोनहि बंडांच्या हेतूंत, धर्म- बुद्धीचा, म्हणजे श्रीक्षेत्र सोडवून घेण्याचा मागमूस नव्हता; व खरें बोला- वयाचे तर ब्रिटिश सरकारच्या हातून धर्मदृष्ट्या गैरवर्तन असें काशीस घडल्याचे लोक सांगत नाहींत.

 काशत मुसलमानांचा अंमल शिथिल झाला, पण इंग्रजांचा अंमल अद्यापि पक्का स्थापित व्हावयाचा होता. अशा या संधिकालांत, मराठ्यांचे वर्चस्व हिंदु- स्थानांतल्या इतर भागांप्रमाणें तें उत्तर हिंदुस्थानांतहि होतें. आणि मराठ्यांच्या मनांत काशी व प्रयाग दोनहि सोडवून घ्यावयाची होती, यांत शंका नाहीं. पण त्यांना ती केव्हांहि प्रत्यक्ष सोडवून घेतां आलीं नाहींत, ही गोष्ट मात्र निर्विवाद आहे. होळकर व शिंदे दोघांच्याहि मनांत बनारस घेण्याचें फार होतें. आणि पहिल्याच धडाक्यास हें काम व्हावयाचे, पण दुर्दैवानें: काशीतील ब्राह्मण रहिवाश्यांना हवें तितकें ध्येय नसल्यामुळे त्यांजकडून, मराठ्यांना जी मदत या कामी व्हावयाची ती झाली नाहीं, इतकेंच नव्हे . तर या कार्यास ते एकप्रकारें आडच आले. मराठी ऐतिहासिक साधनांच्या तिसऱ्या खंडांत कायगांवकर दीक्षितांस लिहिलेले एक पत्र आहे, त्यांत: खालील मजकूर आढळतो:- " मल्हारजीचे चित्तांत की मशीद विश्वेश्वराची ज्ञानवापीजवळील ते पाडून देवालय करावें. परंतु पंचद्राविडी ब्राह्मण चिंता, करितात कीं, हे मशीद प्रसिद्ध आहे. पातशहाचा हुकूम नसतां पाटील देऊळ. करील तर एखादा पातशहा दुष्ट झाला, म्हणजे ब्राह्मणांस भरण येईल. जीवच. घेईल, यवन प्रबल, या प्रांतीं विशेष आहेत. सर्वाचे चित्तास, येत नाहीं... दुसरे जागा. बांधिले तरी बरें आहे. ब्राह्मण चिंता करितात **** दुर्दशा होईल. गंगासमर्थ मना करिता कोणी नाहीं. - मना. करावें तरी पाप कीं देवाची स्थापना, मना करावी हा दोष परंतु ब्राह्मणा संकट न पड़े तें करावें हें पुण्य विशेष, याजवर मशीद पाडूं लागतील तेव्हां सर्व