पान:इतिहास-विहार.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केळकरांचे लेख
इतिहास व इतिहास-संशोधन *

"मी.स्वतः कोणी मोठा इतिहासकार किंवा इतिहास संशोधक नाहीं. तथापि या विषयाची मला विशेष आवड आहे. ज्या संस्थेच्या वाढ- दिवसानिमित्त आजचें व्याख्यान आहे तिचा जन्म १० वर्षांपूर्वी झाला. त्याहि पूर्वी ३०/३५ वर्षे इतिहास संशोधनास सुरवात झालेली असून या J अवधीत या विषयाची जी मेहनत मशागत झाली तिचेंच फळ प्रस्तुतः संस्था है होय. इतिहास-संशोधनावर पुष्कळांचे पुष्कळ आक्षेप आहेत. एक म्हणतो नवा इतिहास बनवितां येत नसला म्हणजे जुन्याची आठवण होते ! पण शनवारचा वांडा बांधता आला नाहीं म्हणून त्याचे पायें 'उकरून जुनी मांडणी - मोडणी दाखविणें हैंहि एक कामच आहे. हल्लींहि इतिहास बनत नाहीं असं म्हणतां येणार नाहीं. आज घडत असलेल्या इतिहासाचेहि पन्नास वर्षांनीं चीज होईल. सरकारी पब्लिकवर्क्स - खात्याप्रमाणें एकीकडे नवी इमारत बांधणे व दुसरीकडे. जुन्या इमारतींची रिपेरी करणें ह्रीं दोनहि कामें बरोबर चालली पाहिजेत. ऐश्वर्यसंपन्न जिवंत राष्ट्रहि आपल्या जुन्या इतिहासाचें संशोधन करितात. जगांत आज आपल्या डोळ्यांदेखत नवा इतिहास कर्तेपणाने घडविण्याचें श्रेय इंग्लंडइतकें दुसन्या कोणत्याहि राष्ट्रास लाभत नाहीं. तथापि इंग्लंडचे लोक अद्यापि इंग्रजी इतिहासाचें संशोधन, करितात. ब्रिटिश म्युझियममधील जुनीपुराणीं हजारोंचीनदेशाची संक्षिप्त माहिती


 *भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वाढदिवशीं झालेले व्याख्यान. ( ता. २०० जुलै १९२० )