पान:इतिहास-विहार.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
केळकरांचे लेख

आणि सुमारे आठशे वर्षे पर्यंत काशी हैं हिंदुधर्मक्षेत्रांपेक्षां बौद्धक्षेत्र म्हणण्यास- अधिक लायक होतें !

 चवथ्या शतकापासून काशीस बौद्धधर्माचे महत्त्व कमी होऊन पुनः हिंदुधर्माचें वर्चस्व प्रस्थापित होऊ लागले होते. आद्य श्रीशंकराचार्यांनीं काशीस हिंदुधर्मजागृति केली; तरी चिनी प्रवासी एनसन सातव्या - शतकांत काशीस गेला, तेव्हां तेथे ३०-३५ बौद्ध मठ व बिहार • होतेच. पुढे बौद्धधर्माचा पुरा पाडाव झाल्यावर हिंदू लोक काशींत देवळें बांधू लागले, व नवी वस्ती गंगेच्या कांठीं होऊं लागली. सुमारें पांचों वर्षांनी ( ११९४ सालीं ) महंमद घोरी यानें बनारस घेतलें, व तेथून पुढे इंग्रजांच्या हाती जाईपर्यंत सुमारे सहाशें वर्षेपर्यंत बनारस हें क्षेत्र मुसलमान लोकांच्याच हाती राहिलें नद्यांच्या संगमामुळे शहरांना धर्म- दृष्टया पवित्रपणा येतो, तसेंच राजकीयदृष्ट्याहि त्यांना सहजच महत्त्व येतें. कारण पूर्वीच्या काळी शत्रूपासून बचाव करण्याला नदी आडवी करण्या- सारखे उत्कृष्ट साधन नव्हतें. नद्यांच्या संगमाच्या ठिकाणीं दोन बाजूंनी दुस्तर असा खंदक आपोआप लाभतो. जगांतील राजधान्यांपैकी बऱ्याचशा राजधान्या संगमाजवळ असलेल्या आढळतील. परशत्रु येतो तो प्रथम राजधानी हस्तगत करितो. पण धर्मक्षेत्रेहि हस्तगत केल्याशिवाय त्याचे खरें समाधान होत नाहीं. शत्रु विधर्मी असला म्हणजे तर क्षेत्र जिंकून घेण्याची ही हौस विशेष दिसून येते. महंमद घोरीनें काशीक्षेत्र घेतलें, तें : तेथें राजधानी होती म्हणून नव्हे तर तें पवित्र हिंदुधर्मक्षेत्र होतें म्हणून मुसलमान हे राज्यप्रसाराइतकाच धर्मप्रसारहि प्रिय मानीत असत. औरंग -जेबाच्या आर्धी, व. विशेषतः त्याचे कारकीर्दीत, नव्या मुसलमानी इमारती बांधल्या गेल्याच, पण जुन्या हिंदू इमातरीहि बाटवून विशेष उपयोगांत आणल्या गेल्या. अल्लाउद्दीन यानें काशींतील एक हजार हिंदू देवळें बाटविल्याची दंतकथा आहे. पण खुद्द औरंगजेबाच्या वेळीं बाटविलेली देवळें व बांधिलेल्या मशिदी काशत आज प्रत्यक्ष दृष्टीस पडतात. विश्वे श्वराच्या जुन्या देवळावरील मशीद पाहिली म्हणजे मुसलमान लोकांनी 'पूर्वी हिंदूंचा धर्मच्छल जाणूनबुजून कसा केला हे प्रत्यक्ष दृग्गोचर होते असो; दिल्लीच्या वादग्रहानंतर बनारस ही अयोध्येच्या वजिराच्या ताब्यांत