पान:इतिहास-विहार.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साऱ्या धर्मक्षेत्रांचे एकच नशीब

४३

शीं संबंध आहे ! पण ज्यूइश किंवा यहुदी लोकांचें प्रेम जेरुसलेमचर अस- यास अनेक कारणे आहेत. मुख्य हें कीं, येथेच त्यांचे शेवटचे राज्य नांदुर्ले व जेरुसलेम ही ज्याची मुख्य राजधानी तो पॅलेस्टाईन प्रांत हाच त्यांचा स्वदेश आज पॅलेस्टाईन त्यांच्या स्वाधीन केलें म्हणजे जगांतील सर्वच न्यू लोक उठून येथें येऊन राहतील असें नाहीं. पण ज्यू लोकांची एक - वसाहत हल्लीं पॅलेस्टाईनमध्ये वसली असून ती फैलावत आहे व उत्कर्ष पावत आहे खास. यावरुन त्यांच्या राष्ट्रीय भावनेत खरेपणा दिसतो. ज्यू लोकांमध्ये द्रव्यलोभाशिवाय इतर दुर्गुण बरेच कमी असतात. शिवाय त्यांची परंपरा जुनी आहे; व बाहेर जगांत त्यांचा आजवर पुष्कळ छळ झाला आहे. ही गोष्ट लक्षांत घेतां त्यांना स्वदेश परत मिळाला तर कोणासहि तें बरेच वाटेल!

-२-

सर्व धर्मातील पवित्र क्षेत्राचे नाशिबच असे दिसते की ,ती विधमी लोकांच्या अमलाखाली राहावी. श्रीक्षेत्र प्रयाग व काशी हीं वरील सिद्धांताचीच उदाहरणें होत. काशी हैं आद्य हिंदुधर्मक्षेत्र आहे. बरीचशीं क्षेत्रे नद्यांच्या संगमामुळे पवित्र मानली जातात. खुद्द गंगा आठशे मैल लांब असतां प्रयाग व काशी हीं ठिकाण क्षेत्र बनण्याला संगमच कारणीभूत आहेत. प्रयागास गंगा व यमुना यांचा संगम प्रसिद्धच आहे; पण कांशी हि एक संगमस्थान आहे; हे तितक्या प्रमुखपणे लक्षांत येत नाहीं. हा . संगम गंगा व वारणा किंवा वाराणशी या नद्यांचा. होय. वाराणशी नदी- वरूनच बनारस हें नांव काशीस पडले आहे. बौद्धधर्मापूर्वी काशी हे क्षेत्र पवित्र मानले जात होतेच, पण गौतमबुद्धानेहि आपल्या धर्मदिग्विजयाचा `प्रारंभ करतांना २५०० वर्षापूर्वी श्रीकाशीसच आपल्या कार्यसंचाराची. -मुहूर्तमेढ रोवली. त्या वेळी काशीचा विस्तार हल्लींप्रमाणे केवळ गंगेच्या कांठानें मसून, गंगा व वाराणशी यांच्या चिमट्यांत दोनहि नद्यांच्या कांठी- होता. बुद्धानें पसंत केलेले स्थान सारनाथ हे होय. तें पूर्वी काशीपासून इल्लींइतकें तुटून नव्हतें. बुद्धाच्या उपक्रमामुळे काशीस हिंदुधर्म खालावला