पान:इतिहास-विहार.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
केळकरांचे लेख

भीति मुसलमानांना पडली ! यानंतर जेरुसलेम तुर्कांनी हस्तगत केलें. आणखी बऱ्याच वर्षांनीं फिरून खांदेवदल होण्याची पाळी येऊन इजि-, प्शियन लोकांनी तें तुर्कीपासून हस्तगत केलें. अखेर १०९९ साली ख्रिस्ती क्रुसेडर लोकांनी तें तुर्कापासून सोडवून घेतले. या ख्रिस्ती सैनिकांचा पुढारी बॉयलन याने तेथील हजारों मुसलमानांची कत्तल करून ख्रिस्ती राज्य स्थापले. पूर्वी ज्यू लोकांनीं खुला मदत करून येथे ख्रिस्ती लोकांची कत्तल केली होती, त्याचे उट्टे या वेळीं खिश्चन लोकांनीं ज्यूइश लोकांची कत्तल करून काढलें, पण है ख्रिस्ती राज्य फार दिवस नांदलें नाहीं. ११८७ सालीं तुर्की सुलतान सलाउद्दीन यानें ज़रुसलेम फिरून हस्तगतं केलें. १२२८त. फ्रेडरिक बादशहानें जेरुसलेम सुलतानापासून सोडवून घेतलें. पण १२४३ त कॅरिझमियन नामक रानटी लोकांनीं तें हस्तगत केलें. अखेर १२९१ त सुल्तान खलील यानें वेढा घालून जेरुसलेम हस्तगत केलें. तेव्हांपासून या ख्रिस्ती मक्केवर मुसलमानांची सत्ता फिरून स्थापित झाली.

 यानंतर दुसरीहि एक गोष्ट घडली, ती युरोपांतील धर्मसुधारणा ऊर्फ 'स्फर्मेशन् . ' या सुधारणेमुळें ख्रिस्ती पवित्र क्षेत्रांसंबंधाचा अभिमान शिथिल झाला व रोमन कॅथोलिक पंथांत दोन तट जे पूर्वीच झाले होते त्यांतील ग्रीक चर्चपंथी लोकांखेरीज कोणाहि खिस्त्यांना जेरुसलेमचें महत्त्व उरलें नाहीं: ग्रीक कॅथोलिक पंथाचे लोक मुख्यतः रशियांतच आहेत व ते मात्र पौर्वात्य भावनेप्रमाणे जेरुसलेमला यात्रेचें ठिकाण मानितात, किंबहुना याचमुळे रशिया चतुर्कस्थान यांचे वैर अखेरपर्यंत चालू होतें: क्रिमियन युद्धांत रशियानें तुपासून ख्रिस्ती धर्मक्षेत्रे परत हस्तगत करून घेण्याचा आपला उद्देश आहे असा बहाणा केला होता. पण या वेळी इंग्लंड हें खिस्ती राष्ट्र असूनहि त्यानें तुर्कस्थानाचेंच साहाय्य केलें. शेवटी तहाच्या वेळी मात्र तुर्की अमलां तील : : ख्रिस्ती धर्मक्षेत्रांकडे जाणाऱ्या यात्रेकरूंना त्रास देऊ नये वगैरे बद्दल एक शर्त त्यांकडून मान्य करवून घेण्यांत आली. इल्लीं खिस्ती लोकांची वस्ती येथे फारच थोडी आहे, तेथे एकहि प्रसिद्ध असें खिस्ती देऊळ नाहीं. ख्रिस्ती लोकांपेक्षांहि मुसलमानांना जेरुसलेमचा अभिमान वाटतो. तेथें त्यांची वस्ती बरीच आहे, व मोठ्या मशिदीहि आहेत: ख्रिस्ताचा वृध या शहरी झाला, इतक्या आठवणीपुरताच ख्रिस्ती लोकांचा जेरुसलेम-