पान:इतिहास-विहार.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
धर्मक्षेत्रांचे एकच नशीब

४१

हक्क द्यावे अशी उदारपणाची चळवळ सुरू होती. १८३३ साली ज्यू कॅथोलिक यांना बहिष्कारांतून मुक्त करण्याचा प्रश्न पार्लमेंटपुढे आला, तेव्हां मेकॉलेनें त्यांच्यातर्फे केलेले सुंदर भाषण पुष्कळांनी वाचलेच असेल. 'वर सांगितलेल्या लॉर्ड रॉथ्सचाइल्डचा पूर्वज लंडन शहराकडून पांच वेळां निवडून आला, पण शपथविधीच्या बंधनांमुळे त्याला मत देण्याचा अधिकार मिळेना, पण पुढे १८६६ पासून तो कायद्याने सर्रास मिळाला. १८३२ पर्यंत ज्यूइंश लोकांना लंडनमध्ये दुकान घालूं देत नव्हते. पर्ण इतर राष्ट्रांप्रमाणे इंग्लंडांत त्यांचा छळ असा फारसा झाला नाहीं. अली- कडे तर धनाढ्य ज्यूइश लोकांनी पैशाच्या जोरावर बहुमानाच्या व खान- दानीच्या सर्व पदव्या मिळविल्या असून इंग्रजी राजकारणांतहि त्यांचा सर्वत्र प्रवेश झाला आहे. : हिंदुस्थानचे स्टेटसेक्रेटरी मि० माँटेग्यु हे ज्यू आहेत. ग्लॅडस्टन्साहेबांचे प्रतिस्पर्धी लॉर्ड चीकन्सफील्ड हे ज्यू होते. ही गोष्ट प्रसिद्ध आहे. आमचे व्हाइसरायसाहेबहि ज्यूच आहेत. ज्यूइश लोक व पॅलेस्टाईन प्रांत यांच्याप्रमाणेच जेरुसलेम या धर्म-- क्षेत्राचेहि भाग्य उदयास येणार असे दिसतें. खिस्ती धर्माच्या स्थापनेपूर्वी तें प्रथम स्थानिक मूर्तिपूजकांच्या हातीं होतें. त्यांचा नाश करून ज्यूह लोकांनी ते आपल्या ताब्यांत घेतलें. पॅलेस्टाइन प्रांत रोमन लोकांच्या अमला खाली गेल्यानंतर ज्यू लोकांचे थोडे दिवस सुखाचे गेले, पण कॅलिग्युला 'सारख्या दुष्ट बादशहाकडून पुढे त्यांची विटंबना झाली. नेरोच्या राज्यांत- ज्या वेळी रोम जळाले. त्या वेळी जेरुसलेमहि जाळण्यांत आलें. जस्टिनियन चादशहाचे कारकीर्दीत तेथे पहिले खिस्ती देऊळ बांधण्यांत आलें. रोमन बादशाहीचा नाश झाल्यानंतर इराणचा बादशहा खुभु यानें जेरुसलेम हस्तगतं केले. या वेळीं ख्रिस्ती धर्माच्या द्वेषानें ज्यूइश लोकांनी या इराणी राजांच्या स्वारीला मदत केली. याहि वेळी हे शहर अभीच्या भक्ष्यस्थानी पडून तीत तीनशे वर्षे राखून ठेविलेल्या पवित्र वस्तु एका दिवसांत नाश पावल्या. पुढें मुसलमानी धर्मप्रसारकांच्या स्वाम्या परदेशावर सुरू झाल्या. तेव्हां खलीफा ओमर यानें जेरुसलेम घेतलें, मुसलमानांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे 'लगेच ' तेथें मशीद उभारण्यांत आली. व मक्का, मदिना ही 'पवित्र' क्षेत्र बाजूस · पडून जेरुसलेम हेंच मुसलमानी धर्माचें मुख्य क्षेत्र होतें कीं काय अशी '