पान:इतिहास-विहार.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०.
केळकरांचे लेख

मिळाली. कारण सिरिया, मेसोपोटेमिया, पॅलेस्टाईन वगैरे मुसलमानी अमलाखालच्या प्रांतांत आतां दोस्त राष्ट्रांची हुकमत चालू लागली असून त्यांना. ज्यूइश लोकांची दया येऊन म्हणा, किंवा आपण उपकृत केलेल्या संपन्न लोकांचें एक लहानसें राष्ट्र मुसलमानी मुलखांत निर्माण करून मुसलमानांच्या उरावर ठेवावें म्हणून म्हणा, दोस्त राष्ट्रांनी ज्यूइश लोकां- करितां पॅलेस्टाईन प्रांतांत कांहीं भाग राखून ठेवून त्यांच्या स्वाधीन करण्याचा निश्चय केलेला दिसतो. दोस्त ख्रिस्ती राष्ट्रें क्षणभर ज्यूइश लोकांचें जुनें धर्मवैर विसरून गेली असून मुसलमानांचा नक्षा कसा कमी होईल. याच विचारांत गढून गेली आहेत.

 सुमारे दोन वर्षांपूर्वी लंडन येथील आल्बर्ट हॉलमध्ये एक मोठी सभा भरून पॅलेस्टाईन प्रांताची मँडेट किंवा हुकमत नव्या तहांत इंग्लंडनें स्वीकारली याबद्दल अभिनंदन प्रदर्शित करण्यांत आलें. अध्यक्षस्थानी लॉर्ड रॉथ्सचाइल्ड, इंग्लंडांतील प्रमुख ज्यूइस उमराव, होते. शिवाय २८ देशांतील ज्यूइश लोकांचे प्रतिनिधीहि आले होते.. मुख्य भाषण मे. बाल्कोर यांचें झालें. त्यांत त्यांनी असे बोलून दाखविलें कीं, अरव लोकांना इंग्रजांनी तुर्कीच्या जुलमापासून सोडविलें हें ध्यानांत घेऊन अर- बांनी ज्यूइश लोकांना पॅलेस्टाईन प्रांतांत गुण्यागोविंदाने नांदू द्यावें. लॉर्ड रॉबर्ट, सेसिल यांनीं तर, राष्ट्रसंघाच्या कल्पनेच्या बरोबरीने ज्यूइश लोकांच्या पॅलेस्टाईनमधील पुनःप्रतिष्ठापनेला महत्त्व आहे असें सांगितलें. एकंदरीनें वेत असा दिसतो की, ज्यूइश लोकांचा पैसा व इंग्रजांची राजसत्ता यांच्या जोरावर पॅलेस्टाईन प्रांतांत एक प्रकारची सामाजिक व धार्मिक उत्क्रांति होणार एवढी मात्र ग्रोष्ट खरी कीं, इतर अनेक युरोपियन राष्ट्रांपेक्षां इंग्लंडने ज्यू लोकांना अधिक सदयतेने वागविलें आहे.

 रोमन कॅथोलिक पंथाचा अंमल इंग्लंडांत असेपर्यंत.. ज्यूइश लोकांना तेथे पाऊल ठेवतां येत नसे. ऑलिव्हर क्रॉमवेलच्या वेळी त्यांना इंग्लंडांत.. येण्याची परवानगी मिळाली, व ज्यांचा जर्मनी, रशिया वगैरे राष्ट्रांत स्व. छळ होईल ते इंग्लंडमध्ये येऊन सुखानें राहत. १८४६ सालापर्यंत. या लोकांना इंग्लंडांतहि जमीन धारण करतां येत नसे, व नागरिकांचे कोणतोह मुलकी हक्क त्यांना नसत. यापूर्वी बरीच वर्षे ज्यूइश. लोकांना हे