पान:इतिहास-विहार.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
केळकरांचे लेख

 पेन्शन सरकारांत वापस घेतले असतां मजवर कोणाचा वहीम राहणार नाही, असे असल्यास वापस घ्यावयाचें ठरवून मला काशीस जाण्याची रजा द्यावी.” शंभर वर्षांपूर्वीच्या पेशवाईच्या निधनकालचा हा असा इतिहास आहे; पण त्यांतूनहि आपणांस पुष्कळ शिकण्यासारखे आहे. ६००० हजार मैलांवरून. मूठभर इंग्रज लोक हिंदुस्थानांत.. येतात काय, हिंदुस्थानच्या तीन टोकावर आपल्या वखारी घालतात काय,व पुष्कळसे. आमचेच लोक आपल्या पदरीं ठेवून आमच्याच राज्यांतून आपल्या सैन्याच्या हाल- "चाली करून आमचेच राज्य कसे घेतात; याचा विचार केला असतां सर्वस्वी परक्या लोकांच्या देशांत आपली सत्ता स्थापन करणें यांत इंग्रजांचें शहाण- पण दिसून आलेंच, पण आपले राज्य घालविण्याच्या बाबतींत आमची आपसांतील दुहीच मुख्यतः कारणीभूत झाली आहे हेहि त्याबरोबर घ्यानांत" ठेवले पाहिजे, १०० वर्षापूर्वीच्या स्थितीत व आजच्या स्थितीत पुष्कळ अंतर पडले आहे. पूर्वीसारखें निर्भेळ स्वराज्य मिळविण्याची खटपट आज आम्ही करीत नसून काळ्यागोल्यांच्या शबल स्वराज्याचे हक्क आम्ही सरकार-पाशीं मागत आहोत, पण हे हक्कसुद्धां थोड्याथोडक्या कारणांनी आपसां-तील दुही कायम ठेवण्याची बुद्धि जोपर्यंत आपल्यांत आहे तोपर्यंत आम्हांला मिळावयाचे नाहींत: आपणांला आपल्या राज्यकर्त्याकडून जें कांहीं मिळवावयाचें तें एकमतानें जोराचा प्रयत्न करून मिळविण्याचा प्रयत्न केल्यासच आपल्याला या स्वराज्याच्या चळवळीत यश येईल.