पान:इतिहास-विहार.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शंभर वर्षापूर्वी

३७

महाराजांना आपल्याबरोबर घेतलें होतें. पण अष्टी येथे पराभव होऊन बाजीरावाने जेव्हां पळ काढला त्या वेळीं सातारच्या महाराजांना इंग्रजांनी 'आपल्या ताब्यांत घेतलें, सातारच्या महाराजांना आपल्या हातीं घरा- बयाचें हा इंग्रजांचा प्रयत्न यापूर्वी तीन वर्षे चालू होता व त्याप्रमाणें महाराजच स्वतः होऊन अष्टीच्या लढाईच्या वेळी इंग्रजांच्या स्वाधीन झाले असें म्हणतात. प्रतापसिंहमहाराज हाती लागल्यावर एलफिन्स्टन- साहेबांनी त्यांना सातारच्या गादीवर नेऊन बसविलें. पुढें ता. ३ जून . १८१८ साली बाजीरावाने पेशवाईचें तिलोदक इंग्रजांच्या हातावर कसें - सोडलें ही हकीकत प्रसिद्धच आहे.. बाजीरावानें जहागिरी जस केल्यामुळे . त्याच्या हाताखालचे सर्व सरदार त्याच्यावर नाराज होते; पण १८१७ च्या सुमारास खुद्द पुण्यांतील लोकाहे बाजीरावावर संतुष्ट होते असें नाहीं व त्या- मुळेंच पुण्याला प्रत्यक्ष वेढा पडला तरी कोणीहि त्याचा प्रतिकार केला नाहीं. पुण्यांत त्या वेळी बाजीरावाच्या कारकीर्दीबद्दल असंतुष्ट असलेले लोक होते एवढेच नव्हे तर बेटावर असलेल्या एलफिन्स्टनसाहेबाला शहरांतील व दरबारांतील बित्तंबातमी देणारे चुगलखोरहि पुण्यांत जिकडे तिकडे पसरले होते. या सीक्रेटसर्विसमधील अग्रगण्य म्हणजे एक खुश्रुशेट मोदी नांवाचे . प्रार्थी गृहस्थ व दुसरे बाळाजी नारायण नातू हे होत. पैकीं खुश्रुशेट मोदीनीं बाजीरावांना व एलफिन्स्टनसाहेबांना दोघानांहि खुष ठेवून दोघांकडूनहि बक्षिसें उपटण्याचा प्रयत्न केला होता, पण तो एलफिन्स्टन साहेबांच्या हुशारीमुळें साधला नाहीं. बाळाजी नारायण नातू मात्र पहिल्यापासूनच सर्वस्वी इंग्रजांचे नोकर म्हणूनच काम करीत होते. शनवारवाड्यावर इंग्रजांचा बावटा लावणाऱ्या बाळाजीपंत नातूना पुढे कसा पश्चाताप झाला हे त्यांनी एलफिन्स्टन- साहेबांस पाठविलेल्या त्यांच्या स्वदस्तुरच्या पत्रांतील एका उतान्यावरून कळून येण्यासारखें आहे. " बाजीरावसाहेब पळून गेले त्या वेळेस पेशवे यांचे वाड्यावर बावटा लावावयास रॉबिनसनसाहेब ( रॉबर्टसन) यांजबरो- बर भलाच पाठविलें; मी जात नव्हतो तेव्हां तुम्ही भितां कीं काय म्हणूं लागले; सबब गेलो; यामुळे बाजीरावसाहेब व त्यांचे राज्यांतील सारे लोकांची मजवर दुष्मानी. सारे लोक एकीकडे व मी एकटा कंपनीचे लष्करांत होतों, सरकारांत माझे तर्फेचा अर्ज करावा व जर माझें इनाम -