पान:इतिहास-विहार.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
केळकरांचे लेख

राजाहि सातारच्या गादीवर बसला नाहीं. सातारा प्रांतांत पेशव्यांसंबंधानें अभियंता वाढविण्यास कोल्हापुरास मराठ्यांची गादी स्थापन करणारी ताराबाई हीच मुख्यतः कारणीभूत झाली होती. सातारची व कोल्हापूरची गादी एक करूं नये असे शाहूमहाराजांकडून निधनसमयीं बाळाजी बाजी - रावांनी लिहून घेतलें होतें, तरी या गाद्यांमधील वितुष्ट काढून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, पण ताराबाईच्या दुस्वासामुळे ही गोष्ट साध्य झाली. नाहीं. मराठेशाहीत कलहाचे बीज पेरणारी व पेशव्यांचें ऐश्वर्य पाहून मनांतून जळफळणारी ही बाई दीर्घायुषी होती व १७६१ सालीं पानपतच्या लढाईनंतर भाऊसाहेब व विश्वासराव यांच्या मरणाची बातमी ऐकून स्वतःची धन्यता मानून ती आपल्या वयाच्या ८२ व्या वर्षी मरण पावली. आज शतकानुशतकें कोल्हापूरचा व पुण्याचा कायमचा द्वेष आहे; पण सातारच्या महाराजांना कैदेत टांकून बाजीरावानें पेशवाई संबंधानें तिकडल्या प्रांतांतील लोकांच्या मनांतहि आपल्याबद्दल तिटकारा उत्पन्न केला होता. बाजीराव: महत्त्वाकांक्षी होता, हुशार होता, धूर्त होता व पेशव्यांचे वर्चस्व हिंदुस्थानांत पुनः स्थापन करावें असें त्याला वाटत असे. पण करांरी व दृढबुद्धीचा नसल्यामुळे त्यांचे कोणतेहि हेतु सिद्धीस गेले. नाहीत. ता. ८ मे सन १८१७ सालच्या या वेढ्यानंतर गोसावी, अरब, पठाण, पेंढारी वगैरे लोकांचें नवीन सैन्य ठेवून इंग्रजांना तोंड देण्याची तयारी त्याने चालविली होती, पण पेशव्यांच्या दरबारांतील हर- घटकेस बित्तंबातमी ठेवणाऱ्या एलफिन्स्टनसाहेबांनीं ही तयारी होण्यापूर्वीच. कलकत्ता, मद्रास वगैरे ठिकाणांहून सैन्य आणवून बाजीरावाचा हा प्रयत्न सिद्धीस जाऊ दिला नाहीं. मराठेशाही स्थापन झाल्यापासून सुरू असलेली सरंजामी पद्धति मोडून पदरच्या सरदारांच्या जहागिरी जप्त केल्यामुळे इतर कोणी सरदार बाजीरावास येऊन मिळाले नाहींत व सवाई माधवरावाच्या वेळीं नानाफडणिसाचा उजवा हात असलेले पटवर्धन सरदारहि आपल्या कांहीं जहागिरी गेल्यामुळे खडकी व अष्टीच्या लढाईच्या वेळीं आपल्या धन्याच्या गादीवर आलेल्या बिकट प्रसंगी बाजीरावाला साहाय्य न करितां उदासीन राहिले. बापू गोखल्यानें माल शेवटपर्यंत बाजीरावाची पाठ सोडली नाहीं. खडकीच्या लढाईनंतर पळतांना बाजीरावानें सातारच्या