पान:इतिहास-विहार.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शंभर वर्षापूर्वी

३५

म्हणून पुण्याली वेढा घातला असें, बखरकारांनी म्हटलें आहे. आपल्या- मार्गात आड येऊन आपले हातपाय पसरण्याच्या कामी अडथळा करणाऱ्या मनुष्यावर खुनाचे आरोप करावयाचे, हा मुत्सद्दीगिरीतील त्रिकालाबाधितः नियम आहे. तेव्हां त्यास इंग्रज लोक तरी कसे अपवाद असणार ? हा वेढा कांहीं एकाएकीं पडला नाहीं. त्रिंबकजी डेंगळ्याला स्वाधीन करण्यासंबंधानें- यापूर्वी बरेच दिवस वाटावाट चालली होती पण ता. ७ मे रोजी एल- फिन्स्टनसाहेबांनी या बाबतींत निकराचें वोलणें चालविलें, तेव्हां आणखी- कांहीं कालहरण करून आपली सैन्याची तयारी करण्यासाठी मुदत मागण्याची पेशव्यांच्या दरबारांत युक्ति काढण्यांत आली. ही युक्ति ओळखून एलफिन्स्टनसाहेबांनी मुदत दिली नाहीं; पण पुण्यांतील दोन. गृहस्थांनी साहेबांकडून मुदत मिळाल्याचे खोटेंच सांगितल्यामुळे बाजीराव. अगदींच गाफिल राहिले, त्यामुळें क. स्मिथ यांस पुण्यास वेढा घालतांना एकहि गोळीबार करावा लागला नाहीं. स्वतःची कोणतीहि तयारी नसतांना वेढा, पडल्यामुळे बाजीराव' अडचणींत सांपडलेला पाहून इंग्रजांनी बाजीराव:: साहेबांकडून वसईच्या तहाचा पुनरुच्चार करून घेतला व रायगड, पुरंदर, सिंहगड हे तीन किल्ले आपल्या स्वाधीन करावे, सब्सिडियरी फौज ठेवण्या- करितां सव्वीस लक्षांचा मुलूख तोडून द्यावा व शिंदे, होळकर वगैरे नर्मदे - च्या उत्तरेकडील सरदारांशीं पेशव्यांचे कोणत्याहि प्रकारचे हक्कसंबंध नाहींत. - अशा प्रकारच्या अटी त्यांच्याकडून कबूल करून घेतल्या. एकहि गोळीबार न. निघतां पुण्यास वेढा पडावा व पाहिजे त्या अटी लिहून देण्याइतकी बाजीरावा -- ची दुर्बळ स्थिति व्हावी याला अनेक कारणे होती. त्यांपैकी सर्वात मुख्य कारण म्हटले म्हणजे बाजीरावावर त्याच्या हाताखालचे सर्व सरदार नाराज होते. हैं होय. शिंदे व होळकर इंग्रजांशी स्वतंत्र तह करून पेशवाईपासून अलग झाले होते, बाळाजी विश्वनाथापासून सर्व पेशव्यांनी सातारच्या गादीचा मान राखला होता; पण बाजीरावाने सातारचे त्या वेळचे महाराज प्रताप सिंह यांना बर्दीत ठेवून या प्रांतांतहि आपल्याला अप्रिय करून घेतलें: होतें. बाजीरावाच्या या कृत्यानें संतापून जाऊन प्रतापसिंहाचा चुलता चतुरसिंग याने बंड केले; पंण त्रिंबकजी डेंगळ्याने त्याचा पराभव करून त्यालाहि कैर्दैत टाकलें. शाहूमहाराजानंतर आपला मान राखून घेणारा