पान:इतिहास-विहार.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
केळकरांचे लेख

पाहिलें तर १६१७ साली शहाजीराजांनी मलिकंबरच्या साहाय्यानें निजाम- शाहीचें संरक्षण करून व त्या दरबारी मराठ्यांचें वर्चस्व स्थापन करून मराठे- शाहीचा पाया घालण्यांचा प्रयत्न चालविला होता असे आढळून येईल. याप्रमाणे १६१७ पासून १८१७ पर्यंत अवघ्या दोनशे वर्षांत महाराष्ट्र- महोदयाचा पूर्वरंग व उत्तररंग होऊन ता. १७ नोवेंबर १८१७ सालों शनिवार वाड्यावर इंग्रजांचें निशाण लागलें, तेव्हां पेशवाई नष्ट होऊन मराठेशाहीची इतिश्रीहि झाली. पेशवाई बुडाली म्हणजे सर्व मराठेशाही बुडाली असे म्हणण्याचें कांहीं कारण नाहीं, असें म्हणणारा एक पक्ष आहे.. १८४८ सालीं मराठेशाहीची परिसमाप्ति झाली हें जरी खरें, तरी मराठे- शाहीचा मुख्य व महत्त्वाचा घटक या नात्यानें विचार केला म्हणजे पेशवाई बुडाली तेव्हांच मराठेशाहीचा सूर्य अस्तास गेला असें म्हणण्यास मला कांहीं. हरकत वाटत नाहीं. १८०३ साली असई मुक्कामी मराठे- शाहीचे मुख्य आधारस्तंभ शिंदे यांचा पराभव करून त्यांच्याशी इंग्रजांनी स्वतंत्र तह केला, तेव्हांपासूनच मराठेशाही नष्ट होण्याच्या मार्गास लागली च तिला पूर्ण नष्ट होण्यास १८०३ पासून १८४८ पर्यंत म्हणजे ४५ वर्षे लागली. १८१७ सालीं राज्यक्रांतीचे निदर्शक असें निशाण शनिवार- चाच्यावर लागलें. त्या वर्षाचा इतिहास सांगतांना आज शंभर वर्षांपूर्वी . बरोबर आजच्याच तारखेस काय घडलें हें पाहण्याजोगे आहे. आज शंभर वर्षापूर्वी ता. ८ मे रोजीच पुण्याचे लोक जागे झाले तो पुण्याला चोहों-: आजून इंग्रजांचा वेढा पडलेला त्यांना आढळून आला. पुण्याचे चौफेर पांच मैल क. स्मिथ यांच्या सैन्याने हा वेढा घातला होता व पुण्याच्या दक्षिणेस इंग्रजांच्या सैन्याचें हेड क्वार्टर असलेल्या पर्वतीजवळ एलफिन्स्टन- साहेब लष्करी शिपायांकडून सलामी घेत फिरत होते. बडोद्याचा दिवाण गंगाधरशास्त्री पटवर्धन याचा खून करविणाऱ्या त्रिंबकजी डेंगळ्यांस आपल्या स्वाधीन करण्याबद्दल बाजीरावाकडून वचन घ्यावें व मुकाट्याने तसे 'वचन न मिळाल्यास तें सक्तीनें घ्यावें, या हेतूनें हा वेढा घालण्यांत आला होता. गंगाधरशास्त्र्याचा खून त्याच्या बडोद्यांतील प्रतिस्पर्ध्यानीं मारेकरी घालून कला, त्यांत त्रिंबकजी डेंगळ्याचे अंग नव्हतें.इंग्रजांनीं कांहीं तरी 'कुमांङ' रचले. पेशव्यांबरोबर लढून त्यांना जेरीस आणावयाचें होतें