पान:इतिहास-विहार.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शंभर वर्षांपूर्वी

३३

बसून केवळ जुने इतिहास वाचीत नसे, परिस्थिति विकट तर खरीच वः खुद्द शिवाजीलाहि तिच्यापुढे कैक वेळां नमावें लागले. तरीपण नाइलाज म्हणून तेथें परिस्थितीचा पाय आपल्या छातीवर सोसून व साधेल तेथे परिस्थितीच्या छातीवर आपला पाय देऊन शक्य तितकें डोके वर उचलणारा कट्टा कर्मयोगी शिवाजी होता. व्यक्तिनिष्ठ स्वातंत्र्यबुद्धि परिस्थिति हीं दोनहि ईश्वरनिर्मितत्व आहेत.

शंभर वर्षांपूर्वी

काही वर्षापूर्वी ६० वर्षापूर्वीचे पुणे या विषयावर मी या मालतच व्याख्यान दिलें होतें; पण तोच विषय थोडा व्यापक दृष्टीने आपणा- पुढे मांडावा या हेतूनें 'शंभर वर्षापूर्वीचा महाराष्ट्र' या विषयावर मी आज बोलणार आहे. त्या वेळी केवळ स्थलवर्णन व लोकवर्णन देऊन मीं पुण्याची माहिती सांगितली होती. आजच्या विषयाला 'मराठेशाहीच्या निघनाचे शतसांवत्सरिक श्राद्ध' असेंहि नांव देता येईल. कारण १८१७ सालीच पेशवाई नष्ट झाली. आपण नेहमी श्राद्ध करतों, म्हणजे एका. प्रकारानें आपल्या वाडवडिलांची आठवणच करतों. तेव्हां या दृष्टीनेच नष्ट झालेल्या पेशवाईची मी आपल्यास आठवण देणार आहे. आज १९१७ साली हिंदुस्थान हैं एक राष्ट्र आहे या नात्यानें आपण सरकारपाशी श काळ्या-गोयांचे - स्वराज्याचे हक्क मागत आहोत, पण तेच आम्ही महा- राष्ट्राचे लोक आज शंभर वर्षांपूर्वी आपल्या स्वतःचे असलेलें 'निर्भेळ स्वराज्य' घालविण्याच्या उद्योगांत होतों. आपल्या देशाच्या इतिहासांतील शतमानें हे मैलाचे दगड कल्पून असेंच मार्गे जाऊन आपण विचार करूं लागलों असतां असें दिसतें कीं, १७१७ साली बाळाजी विश्वनाथास नुकती पेशवाईची वस्त्रे मिळाली होती व त्यानें दिल्लीस जाऊन व चौथाई- सरदेशमुखीच्या सनदा बादशहाकडून मिळवून हिंदुस्थानच्या साम्राज्य विषयक धोरणांत मराठेशाहीचा प्रवेश केला होता. त्याच्याहि मागें १०० वर्षे जाऊन


 * वसंतव्याख्यानमालेतील व्याख्यान- ता. ८ से १९१७-
के... ३