पान:इतिहास-विहार.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
केळकरांचे लेख

गाराचा लोक दगड व विटा मारून छळ करीत व प्रसंगीं त्याला ठारहि मारीत. परवां परंघां १८८२ च्या सुमारास हिंदुस्थानांतील बंगाल प्रांताची "इंग्लंडशी तुलना करून पाहिली असतां बंगालच्या ३० पट गुन्हे इंग्लंडांत होतात असे आढळून आलें, असें पी. एन्. बोस नांवाच्या एका गृहस्थांनी सर वुइल्यम हंटर यांच्या लेखाच्या आधारें आपल्या 'Illusions of New India' या पुस्तकांत लिहिलें आहे. त्याचप्रमाणे लांचलुचपतीसंबंधानें शिवाजी महाराजांना नांवें ठेवणारांनी १८०० सालांत आयर्लंडचें पार्लमेंट जेव्हां इंग्लिश पार्लमेंटला जोडण्यांत आलें त्या वेळीं इंग्लंडचे मुख्य प्रधान पिट यांनी, त्यांच्या मंत्रिमंडळानें व हिंदुस्थानचे गव्हर्नर-जनरल व त्या वेळचे आयर्लंडचे व्हाइसरॉय लॉर्ड कॉर्नवालिस यांनी आयरिश पार्ल- -मेंटनें आपलें थडगें आपणच उकरून ठेवण्यास तयार व्हावें म्हणून लांच- - पतीचे कोणते अनन्वित प्रकार केले हैं इतिहासज्ञांना सांगावयास पाहिजे भसें नाहीं: फार कशाला १७ व्या शतकांतील महाराष्ट्रीय समाजाला नांवें ठेवणाऱ्या व विसाव्या शतकांतील पाश्चात्य सुधारणेचा टेंभा मिरविणान्या प्रोफेसरसाहेबांनीं सभ्यां युरोपांत काय चालले आहे इकडे थोडेंसें लक्ष दिलें असतें तर फार बरे झाले असतें, आज अर्धे युरोप दुसऱ्या अर्ध्याला सनटी, क्रूर, विश्वासघातकी, इत्यादि शेलकी विशेषणे कश देत आहे व -सध्यांच्या प्रसंग तेथे कोणते अनन्वित प्रकार चालले आहेत इकडे प्रोफे- - सरांचे लक्ष गेलें असतें तर आमच्या समाजाला त्यांनीं इतकीं नांवें खालीनें ठेवली नसतीं, तथापि एकंदरीत प्रो. रॉलिनसनसाहेबांनीं कांहीं चुका केल्या असल्या तरी शिवाजीमहाराजांसंबंधांनें युरोपीय ग्रंथकारांची दृष्टि आतां निवळत चालली आहे. ती पूर्ण बदलली म्हणजे हा कलुषित पूर्व- ग्रहरूपी समंध पूर्णपणे गाडला जाईल यांत शंका नाहीं व तसा दिवस सुदैवाने लवकरच येईल अशी मला आशा आहे.