पान:इतिहास-विहार.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रो० रॉलिनसन यांचे शिवचरित्र

२९

आहे; तेव्हां आजच नांवें ठेवण्यासारखे काय आहे, असे सध्याच्या राज्य- " कारभारासंबंधाने आपले मत प्रो० ॲलिनसन यांनी दिले आहे. प्रतिनिधिक राज्यपद्धतीचे तत्त्व आम्हांला माहीत नव्हतें हैं. जरी खरे मानले तरी त्या वेळी आमच्याच देशांतील लोक आमच्यावर राज्य करीत होते हैं तरी खरें आहेना ? मग त्यापूर्वीच्या कालाप्रमाणें व सध्यां संस्थानांत चालू 'असलेल्या राज्यपद्धतीप्रमाणं हिंदी अधिकारीवर्गाच्या हातांत राज्यसूत्रे ' देण्याबद्दल. प्रो० रॉलिनसन हे सरकाराजवळ शिफारस करतील. काय ? विसाव्या शतकांतील पाश्चात्य सुधारणेच्या व नीतिमत्तेच्या मापानें. शिवाजीचे गुणदोष मोजं नयेत किंवा त्यां दगडावर शिवाजीचा स्वभाव कसोटीस · लावू नये; शिवाजीच्या काळचा समाजच अज्ञानांधकारांत बुडून गेलेला - व अत्याचारी होता ( Dark & Violent ) असें विधान करून व शिवाजीची तरफदारी करण्याचा आव घालून त्या वेळच्या महाराष्ट्रीय 'समाजालाच नांव ठेवण्याचा प्रोफेसरसाहेबांनी अत्यंत निद्य प्रयत्न केला आहे. पाश्चात्य नीतिमत्तेचें भाष म्हणजे काय हेंच मला कळत नाहीं. सुधारणा झाल्या किंवा शिक्षण वाढले म्हणजे नीतिमत्ता वाढतेच असे 'नाहीं, तर उलट जास्तच गुन्हे होऊं लागतात अस स्पेन्सरनेच एके ठिकाणी 'म्हटलें आहे.. Dark & Violent age प्रमाणे त्या कालांत समाजांत विशेष क्रूरपणा आढळून येत होता, त्या वेळचे लोकं लांचलुचपत घेणारे होते तेव्हां अशा समाजांत शिवाजीनें लांचलुचपत देऊन किल्ले घेतले, किंवा एकाएक हल्ले करून किल्ले घेतले हे ठीकच झाले असे प्रोफेसरसाहेबांचे म्हणणे आहे. पण ज्या पाश्चात्य समाजाच्या नीतिमत्तेची प्रोफेसरसाहेब बडेजावी सांगतात. त्या समाजांत त्या वेळी कोणते प्रकार घडत होते हैं त्या वेळचा इंग्लंडचा इतिहास वाचणारांच्या तेव्हांच लक्षांत येण्यास रखें आहे! सन १६५० ते १६८५ च्या दरम्यानच्या काळांत इंग्लिश लोकांत राष्ट्रीय चारित्र्य वसत नव्हतें, इंग्लिश समाजांत नीति कशी ती नव्हती, घनी चाकगला.व नवरा बायकोला बदडून काढी अशा प्रकारचा क्रूरपणा चुटुंबांत दिसून येत असे; ड्रेक व रले हे नवीन भूमीचा शोध लावणारे महात्म नसून निवळ चांचे लोक होते व सोन्याच्या खाणी असलेला बेट शोधून काढण्याकरितां हे धाडसाचीं कामें करीत. पायाला खोडा घातलेल्या गुन्हे-