पान:इतिहास-विहार.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
केळकरांचे लेख

मानांना जाऊन मिळालेल्या आपल्या भावाला शासन करण्याकरितांच त्यानें जहागिरीचा वांटा मागितला यांत शिवाजीनें कांहीं अन्याय केला असें नाहीं. शिवाजीच्या अंगांत येण्यासंबंधानें असाच वाद असून या बाबतींत शिवाजी हा धर्मवेडा, किंवा आपल्या अंगांत येते असे लोकांना भास- विण्याइतका तो अप्रामाणिक होता अशा दोन गोष्टी संभवतात, पैकीं तो धार्मिक बुद्धीचा होता तरी तो भाविक भाबडा भोळसट होता असें म्हणतां - यावयाचें नाहीं. त्याच्यावरचा अप्रामाणिकपणाचा आरोप तर सपशेल खोटा 'आहे. उत्पन्न झालेल्या अनक बिकट संकटांना शिवाजीने स्वतः जातीनें तोंड दिलें. अंगांत आल्याचा बहाणा करून व देवीचें खोटें वाक्य सांगून दुसऱ्या कोणाला तरी त्यानें संकंटाच्या तोंडीं दिलें असें झालें नाहीं. अंगांत येण्या- -संबंधाने प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टींतदेखील जर प्रेक्षकांत मतभेद दिसून येतो, तर ३०० वर्षांपूर्वी शिवाजीच्या अंगांत येत होतें कीं नाहीं याबद्दल आज वादविवाद करीत बसण्यांत तात्पर्य काय ? येवढे खरें कीं, आणीबाणीच्या प्रसंगाला कर्त्या व आत्मप्रत्ययी पुरुषाच्या तोंडून आपल्यावर परमेश्वरी कृपा आहे, अमुक एक असें व्हावें अशी परमेश्वराची इच्छा आहे व त्यां - प्रमाणें तें घडून येणारच असें स्वाभाविकपणे उद्गार निघतात, नेपोलियननें फर्स्ट कॉन्सल होण्याच्या प्रसंगीं, सीझरने तुफानांत सांपडल्या वेळीं, व . ऑरेंजच्या वुइल्यमनें समरांगणांत आपल्या आसपास गोळ्यांचा भयंकरः वर्षाव होत असतांना परमेश्वरासंबंधाने असेच आत्मप्रत्ययाचे उद्गार काढले होते, अर्शी इतिहासांत उदाहरणे आहेत. फक्त कर्ते पुरुषच अशा प्रकारचे आत्मविश्वासाचे उद्गार काढतात, व त्यांवर अर्थातच लोकांचा विश्वास बसतो. शिवाजीमहाराज असेच श्रद्धावान व आत्मप्रत्ययी होते, तेव्हां त्यांनीहि वेळोवेळी असे आश्वासनपर व उत्तेजनपर उद्गार काढणें शक्य आहे.

 शिवाजी महाराजांचे चरित्र लिहितांना त्यावेळच्या हिंदुस्थानच्या राज्य- कारभाराच्या व सध्याच्या राज्यकारभाराच्या पद्धतीत तुलना करून, त्यावेळी प्रातिनिधिक राज्यपद्धति हिंदुस्थानच्या लोकांना ठाऊक नसून मौर्य घराण्यां 'तील राजांपासून चालत आलेल्या राज्यपद्धतीप्रमाणेच शिवाजीच्या वेळीहि- -हिंदुस्थानचा कारभार चालला होता व हेल्लींहि तसाच म्हणजे एकतंत्री चालला