पान:इतिहास-विहार.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रो० रॉलिन्सन यांचें शिवचरित्र

२७

पूर्वग्रहाने दूषित नसते तर असे उद्वार त्यांनीं खचित काढले नसते. हिंदु- पादशाहीस्थापनेच्या उच्च आकांक्षेनें प्रेरित होऊन शिवाजीनें राज्य स्थापलें, मोंगल व विजापूरकर यांच्याशी मोठचा मुत्सद्दी गिरनें वागून त्यानें त्यांच्या वर आपला पगडा बसविला, शिवाजीच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी होत गेल्या तरी तो धर्मबुद्धीपासून कधीं ढळला नाहीं, शिवाजीनें आपल्या राज्याची व्यवस्था फार उत्तम ठेविली होती वगैरे गुण प्रोफेसरांनी वर्णन केले आहेत हैं दृष्टीचा कोन बदलल्याचे लक्षण म्हणा किंवा कांहीं म्हणा, त्याबद्दल ते स्तुतीस पात्र आहेत यांत शंका नाहीं.

 पण शिवाजीचे कितीहि गुणवर्णन केले तरी त्यांनीं शिवाजीबद्दल काढले . ल्या कांहीं दोषारोपांच्या उद्गारांवरून त्यांनी केलेलें हें गुणदोषविवेचन निःपक्षपातीपणाचें झालें नाहीं, असें म्हटल्याशिवाय राहवत नाहीं, विजा- पूरची आदिलशाही मोडकळीस आली आणि मोंगलांनी येथे ठेवलेले सरदार मौंगलपादशाहीवर संकट आल्यामुळे देश सोडून निघून गेले ही संधी. साधून शिवाजीनें येथल्या जहागिरी बुडवून देश काबीज केला. याबद्दल. सॅलिनसन साहेबांनी शिवाजीला दोष दिला आहे. पण स्वराज्यस्थापनेच्या काम चालून आलेल्या संधीचा शिवाजीनें योग्य फायदा घेतला याबद्दल. त्याला दोष न देतां उलट परिस्थितीचा योग्य फायदा घेतल्याबद्दल त्याची तारीफच केली पाहिजे. 'लोभमूलक दृष्टि ठेवून शिवाजीनें कोकणप्रांत जिंकला असे प्रोफेसरसाहेब म्हणतात, पण ज्यानें सबंध महाराष्ट्र जिंकला, त्याला आपण देश जिंकावयाचा व कोंकण दुसऱ्याकरितां राखून ठेवावयाचें असें. थोडेच होतें. देशाबरोबर महाराष्ट्रांत समावेश होत असलेला कोकणप्रांतहि जिंकला यांत लोभीपणा कोणता दिसून आला कांहीं कळत नाहीं. कर्नाटक: प्रांत जिंकण्यांत शिवाजीचें अदूरदर्शित्वं दिसून आलें व या कामी त्यानें. मोठा अन्याय केला असें प्रोफेसरसाहेबांचे म्हणणे आहे. दूरदर्शित्व किंवा अदूरदर्शित्व हैं भविष्यकालावरून ठरवावयाचें असतें. तेव्हां या दृष्टीनें पाहिले असतां संभाजीनंतर सर्व महाराष्ट्र देश मोंगलाच्या ताब्यांत गेल्यावर कर्नाटकांतील जिंजी किल्ला मराठ्यांच्या ताब्यांत होता म्हणूनच राजारामाला त्या ठिकाणी जाऊन मराठी राज्य कायम ठेवण्याविषयीं खटपट करतां आली. अर्थात् यांत शिवाजीचें दूरदर्शित्वच दिसून आलें. शिवाय मुसल-