पान:इतिहास-विहार.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रो. रॉलिनसन यांचें 'शिवचरित्र"

या उत्सवांत त्या वर्षी सांपडलेल्या कागदपत्रांवरून महाराजांच्या इति- या हासासंबंधाने हि चर्चा करण्याचा प्रघात आहे. दोन वर्षांपूर्वी अशाच "एका इतिहासाच्या प्रमेयासंबंधाने मी बोललों होतों; पण या दोन वर्षांत तथा प्रकारची चर्चा करण्याजोगे महत्त्वाचे कागदपत्र: सांपडले आहेत असे मला वाटत नसल्यामुळें नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रो० सॅलिनसन यांच्या शिवचरित्रासंबंधानें मी चार शब्द सांगणार आहें. हैं पुस्तक जरी लहान आहे तरी शिवाजीमहाराजांच्या चरित्राबर युरोपियनानें स्वतंत्र रीतीनें लिहि- लेलें असें हें पहिलेच पुस्तक आहे. अँट डफच्या मराठ्यांच्या इतिहासांत शिवाजी हा मराठी राज्याचा संस्थापकच होता म्हणून त्याच्यासंबंधानें वरींच पाने खर्ची पडली आहेत. त्याचप्रमाणे प्रिंझलनें केलेल्या एका मरा- ठयांच्या बखरीच्या भाषांतरांतहि शिवाजी महाराजांचें चरित्र आलें आहे. . पण केवळ महाराजांच्या चरित्रालाच वाहिलेलें असें हें इंग्रजीतील पहिलेच पुस्तक होय असे म्हणावयास हरकत नाहीं. शिवाजीसंबंधानें लिहिणारे सर्व इतिहासकार शिवाजीला लुटारू, दगलबाज वगैरे विशेषणे देतात पण तशा प्रकारचे शब्दप्रयोग या पुस्तकांत नाहींत, प्रत्यक्ष बखरीचें भाषांतर करितांनादेखील मूळ बखरीत असणें संभवनीय नसलेले शिवाजीच्या स्वभा- वाचें वर्णन पूर्वग्रहदूषित झालेल्या मिझलनें केलें आहे. प्रो० रॉलिनसन साहेब या दोषापासून सर्वस्वी अलिप्त राहिलेले नाहींत. युरोपियन इतिहास- कारांनीं शिवाजीवर निंदाव्यंजक शब्दांचा, तर न्या० रानडे यांनीं आपल्या ‘Rise of the Maratha Power' या पुस्तकांत स्तुतीचा भडिमार केला. म्हणून हे दोनहि मार्ग सोडून मीं मध्यममार्ग स्वीकारला आहे, असें प्रो० रॉलिन्सनसाहेबांनी म्हटलेलें आहे पण गुणदोषविवेचनात्मक असा मध्यम मार्ग स्वीकारून त्यांनीं शिवाजीसंबंधानें जे कांहीं उद्गार काढले आहेत तेहि वस्तुस्थितीला धरून नाहींत. त्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासा संबंधानें प्रसिद्ध असलेले ग्रंथ व चरित्रे वाचली असतीं व त्यांचें अंतःकरण


  • ता. २० जून १९९६ रोजी किर्लोस्कर थिएटरांत श्रीशिवाजी उत्सवामध्ये झालेल्या दवाख्यानाचा सारांश.