पान:इतिहास-विहार.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६५ वर्षापूर्वीचें पुणे

२५

आर्या.

प्रथम परीक्षा द्याव्या जिल्हे जज्जासमीप हो जावें ।
प्रश्नोत्तरें समइकें देउनि सर्टीफिकीट हो घ्यावें ॥
श्लोक.

प्राक्तनें मिळे मुनसफी जरी । तरि मनाशि ये बहुत गुर्गुरी ।
द्रव्यमय हें मानवी तसें । लागतें मना इंकृती पिसें ॥ १ ॥

 सामाजिक चालीरीतींसंबंधाने त्या वेळींहि वर्तमानपत्रांतून वाद चालत असे. एक गृहस्थ आपल्याबरोबर गाडीत एका स्त्रीस घेऊन बुधवारांतून गेला, त्याबद्दल जिकडे तिकडे चर्चा सुरू झाली. त्याविषयीं ज्ञानप्रकाश- कारांनी 'त्यानें आपली स्त्री किंवा बहीण बरोबर घेतली असेल' अशा तऱ्हेच्या उदार दृष्टीचें ( Charitable view) विधान करून त्या वेळींहीं त्याचा कैवार घेतला होता. पोषाखावद्दल विचार केला तर त्या वेळी पोषाखाची कांही तरी उंरीव पद्धति असे, पण सध्यां पुण्याच्या पोषाखा-' बद्दल कांहीं ठरीव असें सांगतां येणार नाहीं. करमणुकीसंबंधानें विचार केला तर त्या वेळी नाटकें मुळींच नव्हती. तमाशे व सर्कशी हृींच काय ती करमणुकीची साधनें, 'दारू म्हणजे काय हें आम्हांस ठाऊंकहि नव्हतें; पण इंग्रजी राज्यापासून हा दुर्गुण आमच्यांत शिरला' असे उद्वार तेव्हां- पासून ऐकू येऊ लागले. राजकारणाबद्दल लोक विचार करीत नव्हते असें नाहीं; पण संस्थानिक राजे हे मूर्ख, पराधीन अशी. मात्र सार्वत्रिक समजूत होती. केव्हां केव्हां इंग्रजी राज्याविषयीं प्रतिकूल मतेंहि बाहेर पंडत असत.