पान:इतिहास-विहार.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ 'मॉडेल्स' मुंबईच्या 'टाउनहॉलांत, ठेविलेला होतीं व संस्थानिक वगैरे मंडळी ती पाहण्यास जात असत. टपालाच्या सोईकरितां बैलगाडघा ठेविलेल्या होत्या. येथून टपाल प्रथम पनवेलीस जावयाचें व नंतर मचव्यां तून मुंबईस न्यायाचं, अशी व्यवस्था होती. पुण्याची सांपत्तिक स्थिति कशी होत चालली होती हैं एकानें, वर्तमानपत्रांतूने ओरड केली आहे त्या- चरून कळून येतें. त्या वेळी पुण्यांतील बाजारभाव होते ते पुढीलप्रमाणे:- ज्ञानप्रकाशपुस्तक १-३० एप्रिल सन १८४९, निरख - "केळकरांचे लेख: दररुपयास तांदूळ ४ पायली कैली.. हरभरे ७ पायली गहूं ६||| पायली " ... दररुपयास गूळ १२ शेर वजनी शेर " तूप २ साखर ४ शेर " 2 आपल्याकडे कापूस पिकतो मग कापड कां होऊं नये ? प्रयत्न केला तर करता येईल, अशी कल्पना त्या वेळींही लोकांना आली असा उल्लेख 'आहे. त्या वेळी पुण्यास क्रॉनिकल, व मुंबईस टेलिग्राफ, कुरिअर, प्रभाकर, जामेजमशेट) ज्ञानोदय, समाचारदर्पण वगैरे प्रमुख वर्तमानपत्रे निघत होतीं. 'वाचून काय ध्वज लावणार' ! असे म्हणणारा व 'वाचनांतच सर्वस्व आहे, त्यांतच आपला तरणोपाय आहे' असे म्हणणारा असे दोन पक्ष त्या वेळी अस्तित्वात होते. निमसरकारी पत्रे काढण्याविषयीं त्यावेळींहि प्रयत्न झाला. होता. ज्ञानप्रकाशाचे त्या वेळचे संपादक रा. कृष्णाजी त्रिंबक रानडे हे होते हैं पत्र सिळाछापावर छापले जात असे. त्याची वार्षिक वर्गणी १० रु. असून वर्गणीदार १०० होते व एवढ्या वर्गणीदारांच्या संख्येचा संपादकांना मोठा अभिमान वाटत असे | पुण्यांतील पाठशाळा काढून तेथें कॉलेजें स्थापावीं असा मजकूर ज्ञानप्रकाशांत प्रसिद्ध झाला होता. बहिष्कृत करावें, अशीहि एका गृहस्थानें सूचना आपले विचार लोकांना कळवावे म्हणून तेव्हांची शास्त्री मंडळी एक मराठी वर्तमानपत्र काढणार होती. तेव्हांच्या सुशिक्षित मंडळीचाहि शास्त्री मंडळीवर कटाक्ष होता, ज्ञानप्रकाशांतील नवीन कवितेचा मासूम पड़ा. ८ त्याबद्दल संपादकांना केली होती. .