पान:इतिहास-विहार.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६५ वर्षांपूर्वीचे पुणे

२३

यांची माहिती फाईलमधून वाचून दाखविली ). पुण्याची एक वेळची खानेसुमारी १॥ लाख होती. घरांची संख्या चौदा हजार होती; ती आता १३॥ हजार आहे. ‘पुणे शहराचे रस्ते व डागडुजी व पाण्याचे हौद वगैरे दुरुस्त राहावे यास्तव खर्चपट्टी बसवून बीस हजार रुपये काढावे आणि कमिटी नेमावी याविषयीं सरकारास परवानगीकरितां लिहून गेलें आहे.' या उताऱ्यावरून पाहतां म्युनिसिपालिटीची कल्पना त्या वेळीं होती, त्या वेळची पुण्याची रोजची मृत्युसंख्या ६-७ होती तर ती आतां ९ आहे. शहरांत आगीपासून वगैरे संरक्षण करण्याकरितां आगीचे बंब असल्याबद्दलचा उल्लेख नाहीं. शहरच्या संरक्षणाकरितां एकंदर थोडेसेच शिपाई होते. रात्री आठ वाजतां भरबुधवारांत दरवडे पडल्याचा उल्लेख आहे ! गांवांत पोळ फार होते व त्यांच्या वारंवार होत असलेल्या टकरींत कांहीं मुलें मेली, असाही उल्लेख सांपडतो.

 सरदार पुरंदरे, आबासाहेब ढमढेरे, बाळाजीपंत नातू, गोपाळराव देशमुख, चाळाजी नाईक वगैरे मंडळी प्रसिद्ध होती. त्याचप्रमाणे सात्त्विक व दयाळू साहेब लोकांत मि० ब्राऊन व मि० टर्किन यांची गणना होती. मेकाले- साहेबांच्या विचारांची पुनरुक्ति येथें त्या वेळीं होऊं लागून पाठशाळा मोडून कॉलेजें काढण्याचा विचार चालू होता. शहरांत एकंदर. २२ शाळा असून त्यांत ११२६ मुले शिकत होती. सध्या एकाच शाळेत इतकी मुले आहेत. वकिली व मुन्सफी या दोन परीक्षा चालू होत्या व पुण्याच्या अदालतींत वकिलांची गर्दी झाल्यामुळे त्यांपैकों कांहीं दुसरीकडे पाठवावे असा विचार चालू होता. दक्षिणेच्या परीक्षेस मात्र ४०० वर विद्यार्थी बसत होते. तेव्हांपासूनच चालत आलेल्या दोन संस्था म्हणजे एक नेटिव जनरल लायब्ररी व दुसरी डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी या होत. लोकांत वाचनाभिरुचि वाढली पाहिजे व वर्तमानपत्रे निघालीं पाहिजेत असे विचार उद्भवूं लागले होते हैं ज्ञानप्रकाशास आलेल्या पत्रावरून दिसून येतें. पाश्चात्य देशांत मायक्रॉस्कोप निघून नरीच वर्षे झाली होती. पण तो या वेळीं नुकता हिंदुस्थानांत आला व तो दाख- विण्याकरितां साहेब लोक आमच्या लोकांना घरी बोलावीत असत. हिंदु- स्थानांत अजून आगगाड्या आल्या नव्हत्या; पण त्यांची लहान लहान