पान:इतिहास-विहार.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
केळकरांचे लेख

वर्णन केल्यावर आपणांस तें रम्यतर वाटेल कीं अरम्यतर वाटेल सांगतां येणार नाहीं. निदान कल्पना करण्यास तरी कांहीं हरकत नाहीं. पुणे कसें असेल याची कल्पना करा पाहू ! अगदी पहिली गोष्ट म्हणजे त्या वेळीं लोकांना त्रास द्यावयाला म्युनिसिपालिटी नव्हती ! आजच्या कांहीं खाणा-" खुणांवरून त्या वेळी गांवांत नाले होते व बुधवारांत जावयांचे म्हणजे नाला ओलांडून जावें लागे, त्या वेळचे अरुंद, आंधळे व मुके रस्ते; रस्त्यांतून असलेला गलिच्छपणा तर विचारायलाच नको. रात्री पहावें तर जिकडे तिकडे अंधाराची रोषनाई; शहरचा आतांचा पश्चिमभाग अगद ओसाड असून नारायणपेठेतून जावयाचे म्हणजे भीति वाटत असे, म्हणतात. आतां त्या वेळची माणसे कशी होती? त्यांची पागोटी किती मोठीं होतीं ? त्यांच्या अस्तन्या किती पिळदार होत्या ? त्या अस्तनीत किती वार कापड मावत असे, वगैरेंची कल्पना करणेही फारसे कठीण नाहीं.

 ६५ वर्षापूर्वीचा काळ म्हणजे १८४८-४९ चा काळ; या काळास संधिकाल म्हणता येईल. या वेळीं पूर्वीचा पेशवाईचा प्रकाश मावळला होता व नव्यां मनूचा-इंग्रजीचा - प्रकाश अजून पडावयाचा होता. पेशवाईचें तेज गेल्यामुळे व नवीन प्रकाश अजून पडला नसल्यामुळे आसपास काय चालले आहे, याचे त्यांना ज्ञान नव्हतें. त्या वेळी जुनीं प्रसिद्ध अशी माणसें कोणती हें आतां फारसे चांगले माहीत नाहीं. आतां प्रसिद्ध असलेल्या कांहीं जुन्या मंडळीपैकीं त्या वेळी कांहीँ ऐन उमेदीत होती, कांहीं अजून शिकत होती व कांहींचे बालपणहि संपले नव्हतें. डॉ० भाऊ दाजी त्या वेळी २७, सर टी. माधवराव २०, दादाभाई २०, मंडलीक १५, वामन आबाज मोडक १२, वागळे ९ व माधवराव रानडे ६ वर्षाचे होते. लोकमान्य जन्माला येण्यास अजून आठ वर्षे अवकाश होता तर ना. गोखल्यांना १५ वर्षे होता. या काळचे पुण्याचें वर्णन करायचे म्हणजे त्या वेळची शहराची रचना कशी होती हैं प्रथमं सांगू. आतां जी पेठांचीं नांवें आहेत ती त्या वेळी असली तरी त्या वेळीं रविवार - मालकमपुरा, सोमवार- शहापुरा, मंगळवार - शाहिस्तेपुरा, बुधवार - मांहिनाबाद, शनिवार-मुरजुदा- बाद, रास्ते - शिवपुरी, भवानी - शेरबत, वेताळ - गुरुवार, अर्शी नांवें माहीत होती. (वक्त्यांनी अमृतेश्वर, ओंकारेश्वर वगैरे जुनीं देवळे कोणी बांधिली