पान:इतिहास-विहार.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६५ वर्षांपूर्वीचें पुणे

'६५ वर्षापूर्वीचे पुणे' असा आजचा विषय आहे. ६५ वर्षांपूर्वीच पुणे ज्यांनी पाहिलें आहे अशा वृद्ध गृहस्थांनीं आपल्या जुन्या- आठवणी म्हणून या विषयाबद्दल - कांहीं सांगण्यांतच खरोखरी औचित्य आहे. त्या वेळी ज्यांना जन्मून १०-१२ वर्षे झाली असतील अशी तेव्हांची रा० . बापू पुरुषोत्तम जोशी, रावसाहेब सीतारामपंत पटवर्धन वगैरे मंडळी येथे असती तर त्यांनी आपल्या लहानपणाच्या आठवणी म्हणून तरी कांहीं- सांगितले असते, पण तेही येथें नाहींत, माझे वय ४१ - ४२ वर्षांचे असून आजची हकीकत नातू सांगावयास लागला असें जरी वाटण्याचा संभव: असला तरी तसाच विश्वसनीय पुरावा असल्यावर त्या वेळची हकीकत 'सांगण्यास कोणतीहि हरकत नाहीं. तुम्ही ही हकीकत सांगणार तरी कशी ? एखादा महात्मा तर तुम्हांस वंश नाहींना ? असा कोणी प्रश्न करील. पण, महात्मा वश करण्याच्या मार्गात मी अजून पडलों नाहीं. सुखसंचारक कंपनीचा एखादा त्रिकालदर्शी आरसा तरी आपल्याजवळ असेल ? छे, तसा कांहीं त्रिकालदर्शी आरसा मजजवळ नाहीं; पण तत्कालदर्शी मात्र- एक आरसा आहे व तो म्हणजे येथील सुप्रसिद्ध ज्ञानप्रकाशाचे पहिल्या- दोन वर्षांचें फाईल होय. अशा तऱ्हेच्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या हकीकतीस विश्वसनीय' म्हणण्यास मला कांही हरकत वाटत नाहीं. इतकें फाईल ज्ञानप्रकाशमफिसांतसुद्धां कदाचित् नसेल. पण रा. ब. गोपाळराव हरि देशमुख यांचा पुस्तकसंग्रह, डॉ० नानासाहेब व इतर देशमुखबंधु यांनी लोकमान्य टिळकांच्या स्वाधीन केला त्यांत मला हैं सांपडलें. कल्पनेचें चित्र खरोखरी रम्य असतें. . वर्डस्वर्थनें 'यारो' हें एकः रमणीय व सुंदर स्थल आहे असें ऐकलें होतें;म्हणून त्यावर 'यारो अन्व्हिजिटेड' अर्से एक रम्य काव्यही त्यानें केले, पण तेंच यारो प्रत्यक्षःपाहिल्यावर त्याची निराशा झाली. तसे आपल्या कल्पनेंतल्या पुण्याचे होईल. किंवा नाहीं हें सांगतां यावयाचें नाहीं. कल्पनेपलीकडे जाऊन त्याचे प्रत्यक्ष,


 *वसंत व्याख्यानमालेतील व्याख्यान, ता. १२ मे १९१४.