पान:इतिहास-विहार.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
केळकरांचे लेख

होतें, वगैरे व्यक्तिविषयक गमतीच्या गोष्टीहि यांत वाचावयास मिळतात. टिपूचा मोड झाल्यावर इंग्रजांनी पेशव्यांवर खोगीर ठेवण्याचा प्रयत्न कसा केला; इंग्रज प्रबळ झाले, कलकत्ता वगैरेपर्यंत त्यांचा प्रांत झाला वगैरे चिंता नानास कशी पडली; विलायतच्या राजाचें फर्मान पेशव्यांस सादर कर- 'ण्याच्या निमित्तानें आपला बहुमान करून घेण्याचा इंग्रजांचा कावा नानाच्या शहाणपणानें कसा बिघडला; गोखले व घोंडजी वाघ यांच्या वैमनस्यास प्रारंभ कसा झाला; पटवर्धनी घराण्यांत भाऊबंदकी कशी माजली; अरब, पठाण वगैरे लोक मस्त होऊन गरिबांस व श्रीमंतांसह कसा उपद्रव करीत वगैरे गोष्टीं- संबंधाने माहिती फारच मनोरंजक वाटते. शंभर-सवाशे वर्षापूर्वी मनुष्य- स्वभाव किंवा राजकारण हैं आजच्याहून कांहीं वेगळे होते असे नाही. परंतु आरशांत आपलेच प्रतिचित्र पाहिले असतां जशी क्षणभर मौज वाटते, तसाच प्रकार. इतिहासाचे अस्सल कागदपत्र वाचीत असतां होऊन, येणारास बोधाही मिळतो.

 शेक्टी या खंडांतील दोन मनोरंजक गोष्टी देतों.पहिली इंग्रजांच्या काव्याविषय. त्यासंबंधी खालील उतारा वाचावा:--

 "गेल्या दोन वर्षात इंग्रजांनीं आपली फौज निजामअलीकडून त्याच्याच राज्यांत चाकरीस ठेवविली व तें राज्य पर्यायाने कन्रजांत आणल्यासारखें केलें. टिपू एवढा बलिष्ठ असतां त्याचें राज्य तर त्यांनीं सबंध बुडविलें. याप्रमाणे हिंदुस्थानांत ते प्रबल सत्ताधीश होऊन बसले तेव्हां पेशवाईंदरबार आपले वर्चस्व कबूल करतो की नाहीं हें चांचपून पहावें असें त्यांच्या मनांत आले, त्यांनी विलायतच्या बादशहाचे म्हणून एक फर्मान बरोबर देऊन चौघे गोरे वकील पुण्यास पाठविले. त्या चौघांनी बाजीरावसाहेबांस सांगितले की, 'आम्ही. विलायतच्या बादशहाचे फर्मान तुम्हास आणले. आहे, त्याचा तुम्ही गौरवपूर्वक स्वीकार करावा. तो गौरव तुम्ही पांच प्रकारांनी करावा, असें आमचे म्हणणे आहे. ते पांच प्रकार हे कीं १ या फर्मानाचा स्वीकार करण्यासाठी श्रीमंतांनी मुद्दाम बाहेर डेरे द्यावे व तेथें दरबाराचा समारंभ व्हावा, २ आम्ही फर्मान घेऊन येऊ तेव्हां श्रीमंतांनी आम्हांस सामोरें यावें ३ मार्गे बकीलमुतलखीच्या वेळेस फर्मान- · वाढीचा समारंभ झाला होता तसा याहि वेळेस थाटमाट व्हावा, ४ आम्ही