पान:इतिहास-विहार.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रह

१९

दरबारांत फर्मान हजर करूं तेव्हां सन्मानार्थ श्रीमंतांनी उभे राहून तें हातीं घ्यावें, ५ त्या प्रसंगानिमित्त खुशालीच्या शंभर तोफा माराव्या. याप्रमाणे 1. इंग्रजांनी डाव टाकतांच बाजीरावसाहेब संकटांत पडले व त्यांनीं नानाकडे विचारावयास पाठविलें कीं, या प्रसंगों कसें वागावें व इंग्रजांस काय उत्तर द्यावें ? राज्यकारभाराची आस्था जरी नानांस बिलकूल राहिली नव्हती तरी पेशवाईचा अभिमान त्यांच्या मनांत जाज्वल्य होता. त्यांनी इंग्रजांचा कावा ओळखून पांच कलमांची उत्तरें सांगितलीं - ११२३३ फर्मान घेण्या- करितां मुद्दाम डेरे देणें व तें घेऊन येणाऱ्यांस सामोरे जाणें व फर्मान- वाडीचा समारंभ करणें हे सन्मान फक्त दिल्लीपतीखेरीज पेशवे सरकार कोणास- हि देत नाहीत. मागें माधवराव बल्लाळ यांच्या वेळीं असेंच विलायतच्या बादशहाचे पत्र घेऊन माष्टिन आला होता त्यानें नेहमींच्या दरबारांत पत्र आणून दिलें तसेंच याहि वेळेस व्हावें; ४ श्रीमंतांनी पत्र उभे राहून घ्यावें असें इंग्रज म्हणतात, तर जेव्हां श्रीमंत दरबारांत जातील तेव्हां बसण्यापूर्वी त्यांस पत्र द्यावें म्हणजे झालें ! श्रीमंतांनीं तें पत्र त्यांच्या हातून घेऊन वाचण्याकरितां मुनशीच्या हवाली करावें; ५ हा खुशालीचा विशेष प्रसंग समजून शंभर तोफा माराव्या असे इंग्रज सांगतात, पण तसें कर- ण्याचें कारण नाहीं. खुशालीच्या इतर सामान्य प्रसंगाप्रमाणें तोफांचे वीस चार मात्र करावे. या बाबतींत इंग्रजांनी पुष्कळ तक्रार व जिकीर केली. तथापि त्यांचें कांहीं चाललें नाहीं, आणि अखेर नानांच्याच म्हणण्याप्रमाणें छ. ११ सबानी (७ जानेवारी १८०० ) विलायतच्या बादशहाचे पत्र वाचण्याचा हा समारंभ घडून आला !”

 दुसरी गोष्ट करवीरकर महाराजासंबंधाची परशुरामभाऊ पटवर्धन व त्यांचे समकालीन छत्रपति शिवाजी महाराज यांचें हाडवैर असल्याचे प्रसिद्धच आहे. परशुरामभाऊ कैदेतून सुटल्यावर करवीरकरांवर स्वारी करण्याचें काम - त्यांजकडे आलें व याच स्वारीत पट्टणकुडीच्या लहानशा लढाईत परशुराम- भाऊंचा पराभव झाला. होणार वेळ आली म्हणजे अशीच येते. भाऊंना तीन जखमा लागून ते पडल्यावर त्यांना आपल्यासमोर घोड्यावर घालून करवीरकरांच्या एका सरदारानें महाराजांपुढे नेलें, तेव्हां महाराजांनी 'मारा' असा हुकूम करतांच भाऊंना घोडयावरून खाली ढकलण्यांत आलें, व