पान:इतिहास-विहार.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रह.

१७

खुलासे व प्रस्तावना अशाच स्वरूपाच्या असतात कीं, त्यांच्या योगानें " विचारसंगति सुलभ होते. खरेशास्त्री यांच्या इतिहाससंशोधनांच्या या कार्याला सुमारे पंचवीस वर्षांपूर्वीपासून सुरुवात झालेली असून त्यांनी सर्व- प्रकारें प्रतिकूल व परावलंबी अशा परिस्थितींत पटवर्धनी दप्तराचे हे अकरा खंड म्हणजे सुमारें सवासहा हजार मोठ्या आकाराची पृष्ठे, नियमित रीतीनें प्रसिद्ध केलीं हें पाहून, परिस्थितीवरहि हुकमत चालविणाऱ्या त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीचें कौतुक करावे तितके थोडे असच म्हणावे लागते.

 या सहाशें पृष्ठांच्या ग्रंथांतील सर्व मनोरंजक बाबी सांगण्यास स्थला- वकाश मिळणे शक्य नाहीं. तथापि मासल्याकरितां म्हणून कांहीं थोडया निवडून देतों. चतुरसिंगाचें बंड फार वेळ टिकले नाहीं. पण हे का घडून आले व त्याने थोडक्यांत किती पराक्रम केला हे वाचण्यासारखे आहे. पुण्याच्या विश्रामबागेसंबंधी माहिती या खंडांत आढळते. पंढरपुरास चंद्र- भागेत स्नान करून पुंडलिकाच्या देवळाभोवती प्रदक्षिणा घालून मृत्यु पावलेल्या डुकरीची कथा तत्कालभावनादर्शक अशीच आहे ! दौलतराव शिंदे, व शिंदेघराण्यांतील बाया यांच्या दरम्यानचा कलह व बायांवर मारे- करी घालण्यापर्यंत आलेली: पाळी वगैरे वृत्तांत मोठा तसा वाटतो. करवी कर महाराजांवर गुलाबखान रोहिल्यांने हल्ला केला व मारेकरी घातल्याचा आरोप परशुरामभाऊंवर निष्कारण आला, याचा खुलासा या खंडांत आहे... किरकोळ लढायांची वर्णने अशी दिलेली आढळतात की, जसे कांहीं वर्तमानपत्रांचे खास बातमीदारच रणक्षेत्रांवरून लिहीत आहेत, तसेच समुद्रावरील एका वादळाचे वर्णनहि चांगले आहे. पटवर्धन घराणीं व करवीरकर महाराज यांच्या वैमनस्याची हकीकत वाचीत असता. हल्ली . चालत असलेले प्रकार अगदीच नवे नसून त्यांचे मूळ सवाशे वर्षांहून हा खंड वाचणारास कळून येते. कऱ्हाडे, चित्पा-वन वगैरेंच्या धात्री हकीकत यांत आली आहे. वेठबिगारीचा प्रकार शंभर वर्षापूर्वी कसा होता याचीहि माहिती यांत मिळते. श्रद्धाळूपणा, धर्मभोळेपणा कितपत होता याविषयीं या खंडात माहिती वाचावयास मिळेल. परशुरामभाऊंस चहा व कॉफी लागत असे, त्यांची चहादाणी रुपयाची होती, नाना फडणविसांना तंबाखूचे, विशेषतः तपकिरीचे व्यसन
के ... २