पान:इतिहास-विहार.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पानिपतचे धर्मवीर

१८५

श्री युद्धे धर्माकरितां झाली असें एक वेळ म्हणतां येईल. परंतु शाहूनंतर उत्तरेकडून दक्षिणेवर स्वारी झाली नाहीं. मग दक्षिणेकडून उत्तरेकडे उलट अहेर सुरू होऊन स्वाऱ्या होऊं लागल्या.पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ यानें दिल्लीस प्रथम जाऊन प्रथम चौथाईच्या सनदा आणल्या व बादशहाच्या नांवाखाली आपला अंमल चालू केला. मुसलमानी पातशाही त्यांनी नाकबूल केली नाही. इंग्रजांनी बंगालच्या दिवाणीच्या बाबतीत जे केलें तेच मराठ्यांनी दिल्लीच्या राजकारणांत केले; त्यांनी तरी दुसरें " काय केलें ?– बाळाजी विश्वनाथ व बाजीराव यांनी जे दिल्लीच्या राज-- कारणांत केलें तेंच पुढे नानासाहेब यानें बरोबर चालविलें, दिल्लीवर आपला कबजा ठेवण्याकरितां भराठ्यांचा सर्व प्रयत्न होता; व परक्या अबदालीने दिल्लीवर येऊन स्वारी केली म्हणून पानिपत झालें दोन वर्षे उत्तर हिंदुस्थानांत कटकट चालू होती. त्याचा अखेर परिणाम " पानिपतांत झाला.

 धर्मवीर हें नांव न देण्याबद्दल माझें दुसरें कारण असें आहे, की गेल्या 4. शंभर वर्षांच्या राजकारणांत मुसलमानांनी आपल्या धर्माकडे ज्या दृष्टीने पाहिले तितक्या कडव्या दृष्टीने आम्हीं आपल्या धर्माकडे केव्हांहि पाहिलें नाहीं. मराठ्यांचा हा गुण म्हणा, दोष म्हणा, ही गोष्ट कोणास अप्रिय वाटेल, पण अप्रिय वाटली तर यापुढे सुधारण्याचा प्रयत्न करा. पण ऐतिहासिक सत्य हैं अप्रिय असले तरी जसेंच्या तसें स्पष्टपणे बोलून दाखविण्याची तयारी पाहिजे. इतिहास पाहिला तर मराठे हे धर्माला राजकारणापेक्षां प्राधान्य देतात असें दिसत नाही; राजकारणच मुख्य मानतात, आपली धर्मक्षेत्रे त्यांनी मुसलमानांपासून प्रयत्न केला असता तर मिळणें कांही अशक्य नव्हतें. पण करतो कोण ? जय झाला तर फार तर तहांत धर्मक्षेत्र सोडविण्याचे कलम * घालतील! पण पाश्चात्य राष्ट्र सर्रहा धर्मयुद्धावर निघत त्याप्रमाणें मराठ्यांनी काशीक्षेत्र सोडविण्याकरितां मोहीम केली असें झालें नाहीं. एकट्या नाना- साहेबांनीं मात्र प्रयत्न केला. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, बनारसपासून चार मैलांच्या आंत मराठ्यांचे सैन्य आलें असें कळतांच गंगेवर ब्राह्मण उघडे बोडके स्नानसंध्या करीत होते त्यांनीं तसेंच धांवत जाऊन विनंति केली की, काशीक्षेत्र काबीज करूं नये ! तुम्ही परत गेल्यावर आमची गांठ