पान:इतिहास-विहार.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८४
केळकरांचे लेख

वकीलसाहेबांनी बोलून दाखविलें कीं, आमच्या राजेसाहेबांनी अशी सदिच्छा दर्शत्रिली आहे कीं, हिंदुस्थानास लवकरच स्वराज्य प्राप्त होवो !" ही दरबारी भाषा कोणास समजत नाहीं ?. लगेच मोतीलाल नेहरू यांनी उठून सांगितलें कीं, "आपण आपल्या राजेसाहेबांना कळवावें कीं, हिंदु- . स्थानास स्वराज्य मिळावे अशी सदिच्छा आपण दर्शविली हे आपले फार उपकार आहेत. " दरबारी भाषा व दरबारी उत्तर हीं बरोबर झाली. पण यावर राजगो गळाचार्यांना बोलण्याची हुक्की आली ! त्यांनी वकिलांस सांगितलें, “ कृपा करून आपल्या महाराजांस कल्वा की, आमच्या देशास स्वराज्य मिळाल्यावर आपण हिंदुस्थानावर स्वारी करूं नये ! " – (हंशाच हंशा) दुभाष्याने वकिलांस राजगोपाळाचायचे म्हणणे समजून सांगितलें, वकीलसाहेबहि हंसून म्हणाले, "अगदी बरोबर. तुमची मागणी रास्त आहे. महाराजांना सांगून मी सरकारी गॅझेटांतच तसे प्रसिद्ध करवितों." स्वराज्य मिळाल्यावर हिंदुस्थानावर स्वारी करूं नका म्हणून हे वकिलाला- सांगणार आणि अमीराच्या मनांत स्वारी करावयाचीच आल्यास राजगोपाळाचार्यांच्या सल्लयामुळें तो थांबणार ! आतां या भोळसट पणाला तुम्ही काय म्हणाल १ म्हणून मी पुनः म्हणतों की, या प्रश्नाकडे पहावयाची दृष्टि समजली पाहिजे व ती दृष्टि हीच कीं, हिंदु- स्थानांतले प्रश्न सोडवावयाचे असतील तर हिंदी मुसलमानांनी हिंदुस्थाना- बाहेर मदत पाहूं नये. पण महंमदअली एक डोळा आमच्यावर ठेवणार ध एक बाहेर ठेवणार, याने कसें बनणार ९ म्हणूनच मी त्यांना विचारले, पानिपत ज्या कारणाकरितां झालें हैं राजकारण तुम्हांस मान्य आहे काय. ?

 व्याख्यात्यांनी पानिपतास पडलेल्या वीरांना धर्मवीर असें म्हटलें. माझें म्हणणे इतकेंच कीं, धर्मवीर खरे पण त्यांचा धर्म कोणता ? व्यक्ति धर्म की आतिधर्म १ कर्तव्यकर्म करीत असतां त्यांनी धारातीर्थी देह ठेविले हा व्यक्तिधर्म होय, व तो त्यांनी उत्तम रीतीनें पाळला. पण जातिधर्मचा म्हणजे हिंदुधर्माचा प्रश्न या ठिकाणीं होता असे दिसत नाही. दत्तोपंत आपटे यांनी म्हटल्याप्रमाणे भाऊसाहेबांची दृष्टि धर्मावर नसून राज- कारणावर होती. हिंदुधर्माकरितां मराठ्यांनी पानिपत केलें हें म्हणणें - इति हासाला धरून नाहीं. शाहूपर्यंत दक्षिणेंत मुसलमानांचे हल्ले होत त्या वेळ