पान:इतिहास-विहार.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८६
केळकरांचे लेख

मुसलमानांशी आहे. अत्रें देऊळ अर्धा मशीद अशी स्थिति असली तरी " गंगेस स्नानसंध्येला पाणी उदंड आहे" ही त्या वेळची धार्मिक वृत्ति ! तेराव्या शतकांत महमुदानें स्वारी केली तेव्हां त्याचा एक सरदार देवळें व मूर्ति फोडीत गेला तो केपकामोरीनच्या टोकापर्यंत ! व तो सर्व हिंदु लोकांच्या प्रांतांतून ! मराठ्यांना धर्माचा अभिमान, तर त्या वेळीं एकातरी हिंदु राजाला धर्माची लाज असावयास पाहिजे होती. तेरावे शतक काय - किंवा पुढे काय, हाच क्रम पुढेहि दिसतो. म्हणून धर्मकारणापेक्षां राज- कारणी स्वभावच मराठ्यांचा दिसतो. हा गुण म्हणा, दोष म्हणा. दोष वाटला तर काढून टाका. पण मराठे धर्माला राजकारणापेक्षां वरचे स्थान देत नखत, असे इतिहासावरून स्पष्टं दिसतें. ऐतिहासिक सत्य म्हणून तें आपणांस कबूल करणें भाग आहे. जातिधर्म म्हणजे हिंदुधर्म या दृष्टीनें पानिपतच्या वीरांना धर्मवीर असें म्हणावयाचे नसून, आपद्धर्माचे प्रसंगी ब्राह्मणांनीं क्षत्रियधर्म देखील स्वीकारला, अंगीकृत कार्याची सड पोचविण्यासाठी मराठ्यांनीं धारातीर्थी देह ठेविले, म्हणजे त्यांनी व्याक्तिधर्म उत्तम रीतीचे फळ म्हणूनच त्यांचे आज स्मरण करावयाचें आहे.




समाप्त.