पान:इतिहास-विहार.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पानिपतचे धर्मवीर

१८३

परके मुसलमान हा मुद्दा मुख्य आहे हे विसरून चालणार नाहीं, दुसरे कारण : 4. मी त्यांना सांगितलें तें असें कीं, पानिपतास जे झाले तें आम्ही पुढें चाळीस. - सव्याज भरून काढलें, त्याची वाट काय ? पानिपतच्या नंतर दहा वर्षाच्या आतच मराठ्यांच्या पुनः दिल्लीकडे खाया होऊं लागल्या व पुनः त्यांनी दिल्लीचा बादशहा आपल्या खांकोटीस मारला ! इंटर या इंग्रजी इतिहासकारानेंच असे लिहून ठेविलें आहे कीं, १८०३. साली आम्हीं राज्य जिंकलें तें मोगलांकडून नव्हे, तर मराठ्यांच्याकडूनः ! : पानिपतानंतर मुसलमानांचे काय राहिले ? पानिपतानंतर अवदालीची तर. इतकी दुर्दशा झाली की, त्यानें पुनः दिल्लीचें तोहि पाहिलें नाहीं !. दिल्लीचे राजकारण शेवटी व शेवटपर्यंत मराठ्यांनीच आपल्या मुठीत ठेविलें : : महंमदअल्लीसारख्या विद्वेषी प्रतिस्पर्ध्याना अशी : प्रत्युत्तरे वेळोवेळी ऊन गप्प बसविले पाहिजे. अहसकारितेच्या भरांत सुद्धां या सुशिक्षित : इणविणान्या पुढाऱ्यांची अशी भावना की, केमालपाशा इंग्रजांच्या हातून हिंदुस्थानास स्वराज्य मिळवून देणार! आणि एकादा धर्माचा अवतार नवीन उत्पन्न होतो त्याचप्रमाणें म्हणे आम्ही त्याच्या आगमनाची तयारी करावी म्हणून हे आम्हांस सांगतात ! हिंदु-मुसलमानांच्या तंट्यांतली खरी- दृष्टि काय आहे ती लक्षांत घ्या. मुसलमान झाला तरी तो सरहद्दीच्या आतला आहे की बाहेरचा आहे; ही दृष्टि ठेवून शंभर वर्षापूर्वीचे राजकारण चालले होतें. . दिल्लीच्या राजकारणाची वांटणी हिंदुस्थानांतले हिंदु-मुसलमान' आम्ही काय वाटेल ती पाहून घेऊ, परक्या- हिंदुस्थान बाहेरच्या माणसाला त्यांत लक्ष घालू देणार नाहीं ही दृष्टि तुम्हांस मान्य आहे काय?

  पण राजकारणांतली ही दृष्टि नसलेले मोठे लोकसुद्धां भोळसटपणानें कशा घोडचुका करतात त्यांचे विषयांतूनच विषय निघाला, म्हणून एक उदाहरण सांगतो. तुम्हालासुद्धां ऐकून इतक्या भोळ्या स्वभावाचा अचंबा व चमत्कार वाटेल. दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्थानाचे : परराष्ट्रीय वकील: हिंदुस्थानांत आले असतां महंमदअलीच्यातर्फे हिंदी पुढाऱ्यांची भेट घेण्याची त्यांनी इच्छा दर्शविली, त्याप्रमाणे त्यांनीं आपल्याकडेच आम्हांला - हात्रे आमंत्रण दिलें, त्या प्रसंगी महंमदअल्ली, मी, नेहरू वगैरे बरीच ळी असून राजगोपाळाचार्यहि हजर होते. समारंभ आटोपल्यानंतर