पान:इतिहास-विहार.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पानिपतचे धर्मवीर
[ उपव्याख्यानं ]

आजचे व्याख्याते रा॰ पेंडसे यांनी पानिपतचें जे वर्णन केलें आहे तें मन तल्लीन करून सोडणारे होते. मी प्रत्यक्ष पानिपतचे रणमैदान, दिल्ली बगैरे प्रदेश या दृष्टीने स्वतः हिंडून पाहून आलो असल्याकारणानें, व्याख्याते युद्धाचें वर्णन करीत असतां माझ्या डोळ्यांसमोर त्या प्रसंगाचें एक मोठे चित्रच उभें राहिलें होतें. अंगीकृत कार्याकरितां मराठे वीरांनी धारातीर्थी देह ठेविले, या दृष्टीनें आजच्या दिवशीं या प्रसंगाचे स्मरण करण युक्त आहे. जय किंवा पराजय या एकाच दृष्टीने पानिपतच्या प्रसंगा- कूडे पाहणें योग्य किंवा न्याय्य होणार नाहीं.

 महंमदअलींचे उदाहरण घेऊन मुसलमान लोक पानिपतची आठवण काढून हिंदून! चिडवीत असतात असें जें व्याख्यात्यांनी सांगितलें तें कांहीं खोटें नाहीं. महंमदअल्लींकडून होणारी ही गोष्ट मी स्वतः अनेक वेळ पाहिली, आहे. वादाच्या भरांत ते आले की नेहमी मला म्हणतात, 'Let us fight Panipat over again.' परवां कानपुरास सरोजिनीबाईच्या सन्मानाकरितां जावयास महंमदअल्ली व मी जोडीनें जात असतां कोणी एकजण म्हणाला, "हे पहा मराठे व रोहिले एकत्र मिळून चालले आहेत." त्या वेळी काय किंवा इतर वादाच्या वेळींहि महंमदअल्लींच्या तोंडीं जो शब्द येतो तो हा कीं, "आपण पुन्हा एकदां पानिपत खेळू.”

पण यावर मी त्यांना दोन उत्तरें दिलीं, मीं म्हटलें,"पानिपतची आठवण तुम्ही वारंवार काढतां. पानिपत कसें काय झालें हें आपणां दोघां- नाहि कळतें ! पण पानिपत कशाकरितां झालें तें तुम्हांस मान्य आहे काय ? परदेशीय मुसलमानांचा व आमचा संबंध नाहीं. हिंदुस्थानांत हिंदु व मुसलमान आम्ही एकमेकांचें पाहून घेऊं, याला तुम्ही तयार आहां काय १ परक्या अबदालीने दिल्लीवर स्वारी केली. त्याला शह बसावा म्हणून पाि पत झालें व इब्राहीम गारद्यासारख्या मुसलमानानेहि त्या प्रसंगी मराठ्या साह्य केलें. तेव्हां हिंदूंचा तुम्हीं पराजय केला यापेक्षां हिंदी मुसलमान